Milind More: धक्कादायक: टोळक्याच्या हल्ल्यात ठाणे शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा मृत्यू

Shiv Sena sub city chief milind more died in a gang attack:रिक्षा चालक स्थानिक असल्याने आपल्या साथीदारांना बोलवून मोरे यांच्यासह त्याच्या सोबत आलेल्या तीन ते चार मित्र परिवाराला मारहाण केली.या मारहाणीत मोरे यांना वर्मी घाव बसला.
SHIV SENA Crime News
SHIV SENA Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Virar: जमावाकडून झालेल्या हल्ल्यात ठाण्याचे उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांचा मृत्यू झाला आहे. ते शिवसेना ठाणे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र होत. अर्नाळा पोलिस तपास करत आहेत.

मिलिंद मोरे (वय ४७) हे आपल्या कुटुंबासोबत ठाण्यात राहत होते. त्यांचे वडील रघुनाथ मोरे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. रघुनाथ मोरे यांनी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखांसह विविध पदांवर काम केले आहे.

रविवारी विरारच्या नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्ट येथे सहलीसाठी आले होते. मोरे यांच्या पुतण्याला एका रिक्षा चालकांनी धडक दिली त्यावरून वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि रिक्षा चालक स्थानिक असल्याने आपल्या साथीदारांना बोलवून मोरे यांच्यासह त्याच्या सोबत आलेल्या तीन ते चार मित्र परिवाराला मारहाण केली. विरारच्या नवापूर येथील सेव्हन सी बीच रिसॉर्ट समोर रविवारी ही घटना घडली.

SHIV SENA Crime News
Avinash Abhyankar: कोकणात मनसे ताकद दाखवणार; 'या' जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व जागा लढणार?

या मारहाणीत मोरे यांना वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदवविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अर्नाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

या घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. ही घटना ठाणे चंदनवाडी येथे कळताच परिसरात शोककला पसरली आहे. मोरे यांचे पार्थिव आज (सोमवारी) ठाण्यात आणण्यात येणार आहे. जवाहरबाग वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोरे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com