Khajuraho Temple Vishnu Idol Dispute Explained : मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मुर्तीचा वाद आता वाढू लागला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानावरून यापूर्वीच वाद निर्माण झाला होता. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत त्यावर पडदा टाकला. पण आता मुर्तीवरूनच नवा मुद्दा चर्चेला आला आहे.
खजुराहो येथील जवारी मंदिरात भगवान विष्णूची भग्नावस्थेतील मूर्ती आहे. ही मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीश गवई यांनी आता तुम्ही देवाकडेच प्रार्थना करा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, असे म्हणता, तर मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा, असे विधान केले होते.
वाद निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी मी सर्व धर्मांचा आदर करतो, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण आता मुर्तीविषयीचा नवा मुद्दा चर्चेत आला आहे. ही मुर्ती नागर शैलीतील अत्यंत सूक्ष्म नक्षीकाम केलेली आहे. मात्र, या मुर्तीचे शीर गायब आहे. धड, हात, पाय सुरक्षित आहेत.
आता गायब शीरावरून दोन प्रवाह समोर आले आहेत. परकीय आक्रमकांनी शीर तोडल्याचा एक दावा केला जातो. या आक्रमकांनी पूजा रोखण्यासाठी मूर्तीचे शीर तोडल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कदाचित ही मुर्ती कधी पूर्ण नव्हतीच. भारतात अपूर्ण मंदिरं आणि अपूर्ण मुर्त्यांची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, या दोन्ही दाव्यांबाबत निश्चित पुरावे नाहीत.
पुरातत्व तज्ज्ञांच्या मते, परकीय आक्रमक अनेकदा संपूर्ण मंदिर पाडत नव्हते. अनेकदा मंदिरातील मुख्य मुर्तीचे ते नुकसान करत. मंदिरातील पूजा रोखणे, हा त्यांचा मुख्य उद्देश असायचा. मुर्तीचे शीर तोडण्याला ते प्राधान्य द्यायचे. अशा अर्धवट मुर्तीची लोक पूजा करत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, खजुराहोवर मोठा हल्ला कधी झाला नाही. असे असते तर बहुतेक मंदिरे नष्ट झाल्याचे पाहायला मिळाले असते. पंधराव्या शतकातील हल्ल्यानंतर खुजराहोला जंगलाचा वेढा पडला होता. अठराव्या शतकात ब्रिटिश अधिकारी टी. एस. बर्ट यांनी पुन्हा खजुराहोचा शोध लावला होता. मुर्तीविषयी दोन प्रवाह असले तरी त्याबाबत एकही ठोस पुरावा नाही. त्यामुळे मुर्तीच्या शीराचे गुढ वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.