Bihar Politics : पहिल्याच निवडणुकीत लालूंचा पराभव, नितीश कुमार ठरले जायंट किलर!

Lalu Prasad Yadav’s First Election Defeat : समाजवादी नेते श्रीकृष्ण सिंह यांचे पुत्र नरेंद्र सिंह हे पटना विद्यापीठात सोशलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. त्यांनीच लालूंना विद्यार्थी दशेत असताना राजकारणात उतरवले.
Lalu Prasad Yadav, Nitish Kumar
Lalu Prasad Yadav, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. लालू प्रसाद यादव यांचा पहिल्या विद्यार्थी निवडणुकीत पराभव झाला, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी विजय मिळवून राजकारणात पाऊल घट्ट रोवले.

  2. नितीश कुमार यांनी पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या दबदब्यात विजय मिळवत ‘जायंट किलर’ ठरले, आणि तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

  3. दोन्ही नेत्यांची राजकीय सुरुवात विद्यार्थी संघटनांतून झाली, ज्यामुळे पुढे ते बिहारच्या राजकारणातील मुख्य नेते बनले.

Bihar election history : बिहारच्या राजकारणातील दोन मातब्बर नेते म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव. या दोघांशिवाय सध्या बिहारमधील राजकारणात पानही हलत नाही. मागील अनेक वर्षांपासून याच दोन नेत्यांच्या नावाभोवती बिहारचे राजकारण फिरत राहिले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचंच वारं वाहतंय. पण त्यांच्या राजकारणाची सुरूवात कुठून झाली, हे तुम्हाला माहिती आहे का?

लालूंचा पराभव

फुलवरिया हे लालूंचे मुळ गाव. त्यांनी उच्च शिक्षणासाठी पटना विद्यापीठाअंतर्गत असलेल्या बीएन महाविद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यापीठात विद्यार्थी निवडणुकांचे वारे त्याकाळी जोरकसपणे वाहत होते. लोहियांच्या समाजवादी विचारांचा पगडा अनेक विद्यार्थ्यांवर होता. लालू प्रसाद यादवही त्याकडे ओढले गेले आणि तिथून त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरूवात झाली.

समाजवादी नेते श्रीकृष्ण सिंह यांचे पुत्र नरेंद्र सिंह हे पटना विद्यापीठात सोशलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. त्यांनीच लालूंना विद्यार्थी दशेत असताना राजकारणात उतरवले. सोशलिस्ट पक्षाच्या विद्यार्थी शाखेत लालूंची पहिली एन्ट्री झाली. 1970 मध्ये लालूंनी पटना विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. पण त्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.

Lalu Prasad Yadav, Nitish Kumar
Vote Chori allegations : निवडणूक आयोगाने सगळे पत्ते खोलले; राहुल गांधींची 'आतली माणसं’ कोण?

पहिल्याच निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या लालूंनी विद्यार्थी राजकारणातून माघार घेत नोकरीचा शोध सुरू केला. पटनामध्ये लेखनिकाची नोकरी पकडली. पण काही कालावधीने ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. पटना विधी महाविद्यालयात प्रवेश घेत विद्यापीठाच्या विद्याथी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. दुसऱ्या प्रयत्नात लालूंना विजय मिळाला होता.

नितीश कुमारांचा विजय

लालूंना दुसऱ्या प्रयत्नांनंतर राजकारणातील पहिला विजय मिळाला होता. पण नितीश कुमार पहिल्याच प्रयत्नात जायंट किलर ठरले होते. 1960 च्या दशकात ते बिख्तियारपूर येथील इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पटनामध्ये आले होते. बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्यांना प्रवेश मिळाला होता. तिथूनच त्यांचे राजकारण सुरू झाले. त्यावेळी कॉलेजमध्ये काँग्रेसचा दबदबा होता.

Lalu Prasad Yadav, Nitish Kumar
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवईंच्या 'त्या' विधानावरून वाद; टीका होताच स्पष्ट केली भूमिका, मेहता, सिब्बलही मदतीला...

नितीश कुमार यांचे मित्र सुरेश शेखर, अरुण सिन्हा आणि नरेंद्र सन्हा यांनी त्यांनी राजकारणात आणलं. मित्रांच्या आग्रहाखात नितीश कुमार यांनी कॉलेजच्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मित्रांनीच त्यांचा जोरदार प्रचार केला. काँग्रेसची लाट असतानाही नितीश कुमार विजयी झाले. पहिल्याच निवडणुकीत ते जायंट किलर ठरले होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: लालू प्रसाद यादव यांनी राजकारणात कधी प्रवेश केला?
A: 1970 मध्ये पटना विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतून.

Q2: लालूंचा पहिला पराभव कुठे झाला?
A: काँग्रेसच्या पाठिंब्याच्या उमेदवाराकडून पटना विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत.

Q3: नितीश कुमार यांचा पहिला विजय कुठे झाला?
A: बिहार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत.

Q4: नितीश कुमारना ‘जायंट किलर’ का म्हटले गेले?
A: कारण काँग्रेसची लाट असूनही त्यांनी पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com