By election Result Sarkarnama
देश

BY Election : पाच राज्यांतील पोटनिवडणुकीत काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर : दोघांचे उमेदवार तीन ठिकाणी आघाडीवर

कसब्यात बाराव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ४६१२ मतांनी आघाडीवर आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : ईशान्येतील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांशिवाय पाच राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांची (By Election) मतमोजणी सुरू आहे. या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, झारखंड, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेस (Congress) ४६१२ मतांनी आघाडीवर आहे, तर इरोडमध्ये दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर काँग्रेसने १२ हजार मतांची आघाडी घेतली आहे. (Big fight between Congress-BJP in by-elections in five states)

महाराष्ट्र कसब्यात काँग्रेस, तर चिंचवडमध्ये भाजप पुढे

कसब्यात बाराव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ४६१२ मतांनी आघाडीवर आहेत. धंगेकर हे पहिल्या फेरीपासून मताधिक्क्य घेतले होते. ते बाराव्या फेरीअखेरपर्यंत कायम होते. दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपच्या (BJP) अश्विनी जगताप यांनीही पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर आहेत. दहाव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी ७४१६ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांची आघाडी उत्तरोतर वाढत गेली आहे.

तामिळनाडूत काँग्रेस उमेदवार आघाडीवर

इरोड जागेवर काँग्रेसने एलंगोवन यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर एलंगोवन हे एस थेनारासू (एआयएडीएमके) यांच्यावर ६००० मतांनी आघाडीवर आहेत. येथे सुमारे ७७ उमेदवारांमध्ये लढत होती.

झारखंडमध्ये भाजप युती उमेदवाराला पाच हजार मतांची आघाडी

काँग्रेसच्या ममता देवी फौजदारी खटल्यामुळे अपात्र ठरल्यानंतर रामगडची जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने ममतादेवी यांचे पती बजरंग महतो यांना तिकीट दिले आहे. भाजप-एजेएसयूने सुनीता चौधरी यांना उमेदवारी दिली. येथे १८ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या फेरीनंतर भाजप-एजेएसयु युतीच्या सुनीता चौधरी पाच हजार मतांनी पुढे आहेत.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आघाडीवर

डिसेंबर २०२२ मध्ये तीन वेळा तृणमूल काँग्रेसचे आमदार सुब्रत साहा यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. तृणमूल काँग्रेसचे देबाशिष बॅनर्जी, भाजपचे दिलीप साहा आणि विरोधी काँग्रेसचे बॅरन बिस्वास यांच्यात लढत आहे. तीन फेऱ्यांनंतर काँग्रेसचे बॅरन बिस्वास ५०० मतांनी आघाडीवर आहेत.

अरुणाचलमध्ये भाजपचा बिनविरोध विजय

अरुणाचल प्रदेशातील लुमला ही जागा भाजपचे जांबे ताशी यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. यानंतर भाजपने तेसरिंग ल्हामु यांना येथे उमेदवारी दिली. अन्य उमेदवार नसल्यामुळे भाजपने ही जागा बिनविरोध जिंकली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT