Kasba - Chinchwad By Election Results : कसब्यात धंगेकर आघाडीवर तर रासनेंची पिछाडी, चिंचवडला जगताप आघाडीवर

BJP Vs Mahavikas Aaghadi : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी सुरु
Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant RasaneSarkarnama
Published on
Updated on

Pune & Chinchwad By Election News : कसबा , चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यादरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत कसब्यात धंगेकर हे आघाडीवर असून भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत. तर चिंचवडमध्ये तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जाधव आघाडी घेतली आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२) मतमोजणी सुरु झाली आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य तिरंगी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने रिंगणात आहेत. ऱ्या

Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Manish Sisodia : दिल्लीत काँग्रेस सावध, पण माकन आक्रमक; सीबीआयचे कौतूक तर ‘आप’वर भ्रष्टाचाराचा आरोप

कसब्यात धंगेकर यांनी दुसऱ्या फेरीत धंगकेर यांनी १६०० मतांनी आघाडी घेतली आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यांत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीत ७,८८२ तर नाना काटे यांना ७,२०६ तर राहुल कलाटे यांना २,६४५ मते पडली आहेत. यात तिसऱ्या फेरीअखेर जगताप या १,७८७ मतांनी आघाडी घेतली आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.

Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Pune By Election Result : कसब्यात रासने की धंगेकर ; चिंचवडचा नवा आमदार कोण ?

कसबा विधानसभा मतमोजणीच्या 20 फेऱ्या

कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होत आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे.

ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com