नवी दिल्ली : पंजाबमध्ये मोठी उलथापालथ झाली असून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder singh) यांचा पराभव झाला आहे. त्यांनी काही महिन्या आधीत काँग्रेसचा राजीनामा देत आपला पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची स्थापना करत भाजपसोबत युती केली होती. मात्र, त्यांना पटियाला विधानसभा मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांचबरोबर इतरही दिग्गजांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून दोन जागेवरून निवडणूक लढत असलेले मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हेही पराभवाच्या छायेत आहेत.
पंजाब मधील निकाल हे एक्झिट पोल (Exit Poll) नुसारच दिसत असून आपने (AAP) पंजाबमध्ये जोरदार मुंसडी मारत सत्तेच्या जवळ पोचली आहे. पंजाबमधील 117 जागापौकी 90 जांगावर आपने आघाडी घेतली असून सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) 14 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिरोमणी आकाली दलाला 10 तर भाजपने 3 जागेवर आघाडी घेतल्याचे हे चित्र बघायला मिळत आहे. आपच्या झाडूने सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.