Punjab Election Results : आपच्या झाडूचा क्लीन स्विप; सिद्धू, चेन्नीच्या भांडणामुळे पंजाब गमावले...

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) मोठी आघाडी घेतली आहे.
Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
Charanjit Singh Channi and Navjot Singh SidhuFile Photo

नवी दिल्ली : पंजाबमध्ये एक्झिट पोल (Exit Poll) नुसारच कल दिसत असून आपने (AAP) पंजाबमध्ये जोरदार मुंसडी मारत सत्तेच्या जवळ पोचली आहे. पंजाबमधील 117 जागापौकी 89 जांगावर आपने आघाडी घेतली असून सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) 14 जागांवर आघाडी मिळाली. तर शिरोमणी आकाली दलाला 10 तर भाजपने 3 जागेवर आघाडी घेतल्याचे हे चित्र बघायला मिळत आहे. आपच्या झाडूने सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान या पराभवाला नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यातील अंतर्गत कलह जबाबदार असल्याचे मानले जात आहे. यामुळेच काँग्रेसला हातात असलेले राज्य सहज गमवावे लागले आहे.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
दिग्गजांना धक्का : सहा आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर!

2017 च्या पंजाब विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने 77 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाच्या केवळ 20 जागा होत्या मात्र, आज लागलेल्या निकालामध्ये आपने तब्बल 90 जागा मिळवत काँग्रेसला पछाडले आहे. काँग्रेसच्या या पराभवाला कारणीभूत नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांच्यातील संघर्षा धरले जात आहे.

मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी प्रचंड महत्वकाक्षा असलेले सिद्धू यांनी याआधी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी वाद घातल्या यातून कॅप्टन यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सिद्धूकडे मुख्यमंत्रीपद येईल असे सिद्धूसह अनेकांना वाटले होते. मात्र काँग्रेस नेतृत्वाने तसे न करता दलित कार्ड खेळत हूशारी दाखवली आणि चन्नी यांना मुख्यमंत्री केले. यामुळे सिद्धू नाराज झाले आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू आणि चेन्नीमध्ये वाद होत राहिले. याचा थेट फायदा आम आदमी पक्षाला झाला. पंजाबच्या जनतेने भगवंत सिंह मान यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या आपवर विश्वास दाखवत त्यांना एकहाती सत्ता दिली आहे. आपला दिल्लीबाहेर मात्र पहिल्यांदाच इतके मोठे यश मिळाले आहे.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
Punjab Election Results : आपच्या झाडूने काँग्रेसचा सुपडा साफ; सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग पराभवाच्या छायेत

दरम्यान, काँग्रेसने पंजाबमधील सत्ता तर गमावली मात्र आता स्वत: दिग्गज नेत्यांना आपली आमदारकीची चिंता पडली आहे. यामध्ये पंजाब काँग्रेसचे महत्वाचे चेहरे असलेले नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री चरनजीत चेन्नी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पराभवाच्या छायेत असून यांना आपच्या उमेदवाराने घाम चांगलाच फोडला असून ते पिछाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com