Rishi Sunak Latest Marathi News
Rishi Sunak Latest Marathi News Sarkarnama
देश

मोठी बातमी : भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

सरकारनामा ब्यूरो

Rishi Sunak : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदावरील दावा फेटाळण्यात आल्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते घोषीत करण्यात आले. त्यानंतर सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषणा झाली.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या. त्यानंतर झालेल्या निवडीमध्ये सुनक पंतप्रधान झाले आहेत.

काही दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सुनक याना संधी मिळाली. सुनक यांच्या रुपाने ब्रिटनमध्ये पहिल्यादांच भारतीय वंशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे ही भारतासाठीही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

गेल्या महिन्यात, माझी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वासाठी झालेल्या निवडणुकीत सुनक यांचा पराभव केला होता. तेव्हा ट्रस यांना 57.4 टक्के आणि सुनक यांना 42.6 टक्के मते मिळाली होती. मात्र, ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर सुनक यांना संधी मिळाली. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून ब्रिटनला पोहोचले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावाई आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT