Ashok Gehlot, Sachin Pilot
Ashok Gehlot, Sachin Pilot Sarkarnama
देश

Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Rajasthan : राजस्थानमध्ये २०१८ साली काँग्रेस सत्तेत आल्यापासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री गेहलोत- पायलट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या दोन दिग्गज नेत्यामधील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. त्यानंतर आपल्याच सरकारविरोधात ‘जनसंघर्ष यात्रे’ची काढल्यानंतर पायलट यांनी गेहलोत सरकार आणि काँग्रेसला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

सचिन पायलट(Sachin Pilot) यांनी पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चे आयोजन केले होते. अशोक गेहलोत सरकारकडून तत्कालीन वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप पायलट यांच्याकडून करण्यात येत आहे. हाच मुद्दा घेऊन पायलट यांनी एक दिवसासाठी लाक्षणिक उपोषणासह पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चे आयोजन केले होते. ११ मे रोजी या यात्रेची सुरुवात झाली होती. आज म्हणजेच सोमवारी (१५ मे) या यात्रेची सांगता झाली.

१५ दिवसांचा अल्टिमेटम...

आता त्यानंतर आता पायलट यांनी गेहलोत सरकार आणि काँग्रेसला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आगामी १५ दिवसांत वसुंधराराजे(Vasundhara Raje) सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यास आम्ही राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा पायलट यांनी दिला आहे. पायलट यांनी पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चे आयोजन केले होते. ११ मे रोजी या यात्रेची सुरुवात झाली होती. आज म्हणजेच सोमवारी (१५ मे) या यात्रेची सांगता झाली.

आमचं सरकार भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात अपयशी

या महिन्याच्या शेवटपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही जनतेत जाऊन संपूर्ण देशात आंदोलन करू. आम्ही आतापर्यंत गांधीमार्गाने आंदोलन केले. वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास आम्ही प्रत्येक गावात जाऊन आंदोलन करू. आम्ही रखरखत्या उन्हात चालत असून आम्हाला त्याचे दु:ख नाही. मात्र आमचे सरकार भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचे मी मागील अनेक दिवसांपासून म्हणत आहे असे पायलट म्हणाले.

मागील अनेक महिन्यांपासून अशोक गेहलोत(Ashok Gehlot) - सचिन पायलट या दोन दिग्गज नेत्यांमध्ये संघर्ष कमी होण्यऐवजी तीव्र होत चाललेली आहे.हे. मात्र, काँग्रेस हायकमांडने अद्यापही याबाबत कोणताही ठोस पावले गेलेली नाही. पायलट यांना काही तक्रार असेल तर त्यांनी ती काँग्रेस पक्षासमोर मांडावी. त्यावर काँग्रेसच्या अंतर्गतच तोडगा काढला जाईल. पक्षाच्या विरोधात आंदोलन करणे हे पक्षविरोधी कारवाई समजले जाईल अशी भूमिका प्रदेश काँग्रेसने घेतलेली आहे.

२०२० साली काँग्रेस पक्षात बंड झाले होते. या वेळी एकूण २० आमदारांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते. यामध्ये पायलट यांचाही समावेश होता. या बंडानंतर आमदारांनी भाजपाकडून पैसे घेतले आहेत असा आरोप गेहलोत यांनी केला होता. तेव्हापासून पायलट-गेहलोत यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

....तर पुन्हा पायलट बंडांचं निशाण फडकवणार ?

आगामी काही महिन्यांत राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचवेळी राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्याकडे ताकदवान युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. याचदरम्यान,हायकमांड आणि काँग्रेस पक्षाला पायलटांच्या भूमिकांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण यापूर्वीही त्यांनी बंडाच्या निशाण फडकवण्याची जोरदार चर्चा रंगली होती.

हायकमांडच्या मध्यस्थीनंतरही पुन्हा काही दिवसातच गेहलोत, पायलट संघर्ष उफाळून आला आहे. आगामी काळात ते काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा अंतर्गत संघर्ष नक्कीच परवडण्याजोगा नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT