Jamkhed Bazar Samiti: कोण मारणार बाजी? जामखेड बाजार समितीत सम-समान जागेचा पेच; पवार-शिंदेंची प्रतिष्ठा पणाला..

Rohit Pawar Vs Ram Shinde : आज होणार सभापतीची निवड..
Jamkhed Bajar Samiti : Rohit Pawar Vs Ram Shinde News :
Jamkhed Bajar Samiti : Rohit Pawar Vs Ram Shinde News :Sarkarnama

Rohit Pawar Vs Ram Shinde News : अहमदनगर मधील जामखेड कृषीउत्पन्न बाजार समितीतील निवडणूक झाल्यानंतर आता सभापतीपदाबाबत एकच चर्चा रंगली आहे. आज बाजार समिती सभापतीची निवड केली जाणार आहे. यासाठी अनेक जण शर्यतीत आहेत. या बाजारसमितीत राष्ट्रवादी आणि भाजपला सम-समान जागा मिळाल्याने, सभापतीपदाचा मोठा पेच निर्माण झाला होता. (Latest Marathi News)

Jamkhed Bajar Samiti : Rohit Pawar Vs Ram Shinde News :
Pimpri Chinchwad News : उद्योगनगरीतील राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय भाजपाने लाटावे हे दुर्देव; अजित गव्हाणेंचा हल्लाबोल !

या बाजार समितीत कोणाचा सभापती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे आमदार तथा माजी राम शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे आता कुणाचा सभापती होणार, याची उत्सुकता वाढलेली आ

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोघांनाही सम-समान जागा आहेत. एकूण १८ सदस्यसंख्या असलेल्या या बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस ९ आणि भाजप ९ अशा जागा आहेत. बाजार समितीच्या स्थापनेपासून असा पेच पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. आता या ठिकाणी ईश्वरचिठ्ठी काढून सभापतीची निवड करण्यात येईल का? की, फोडाफोडीचं पाहायला मिळतं हे पाहणे, महत्त्वाचं आहे.

Jamkhed Bajar Samiti : Rohit Pawar Vs Ram Shinde News :
MPSC News : एमपीएससीचा सावळागोंधळ कधी थांबणार?; 'आम्हाला भुर्दंड का?' विद्यार्थी संतप्त...

दरम्यान राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी सुधीर राळेभात यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर भाजपकडून सचिन घुमरे आणि शरद कार्ले या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. सकाळी अकरा वाजता या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या बाजार समितीच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com