Congress Leader Sajjan Kumar  Sarkarnama
देश

Congress Leader Sajjan Kumar : शीख दंगलप्रकरणात काँग्रेस नेता सज्जन कुमार यांना मोठा दिलासा; निर्दोष मुक्तता !

1984 Anti Sikh Riots News : सुलतानपुरी भागात घडलेल्या घटनेशी संबंधित खटला..

Chetan Zadpe

Delhi News : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीशी संबंधित दिल्लीतील सुलतानपुरी येथे ६ जणांच्या हत्येप्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आज (दि.२० ऑगस्ट) निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी असेलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार आणि अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सज्जन कुमारवर जमावाला भडकवल्याचा आरोप होता.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्या न्यायालयाने काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना जमावाला भडकवण्याच्या आणि इतर आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. कारण फिर्यादींना सज्जन कुमार यांच्यावरील एकाही आरोपाबाबत पुरावे सादर करता आले नाही.

या प्रकरणात 13 वर्षांपूर्वी म्हणजे जुलै 2010 मध्ये न्यायालयाने सुलतानपुरी येथे शीखविरोधी दंगलीदरम्यान सहा शीख व्यक्तिंच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद, पेरू, कुशल सिंग आणि वेद प्रकाश यांच्यावर आरोप निश्चित केले होते. दंगल प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सज्जन कुमारही तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

हे प्रकरण 2 नोव्हेंबर 1984 रोजी सुलतानपुरी भागात उसळलेल्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित आहे. येथे एक साक्षीदार चाम कौरने या व्यक्तिने जबाब नोंदवला होता की, तिने सज्जन कुमारला जमावाला भडकवताना पाहिले होते. त्यानंतर जमावाने शीखांची निर्घृण हत्या केली. पण, आता न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे की, काँग्रेस नेता सज्जन कुमार यांना दोषी ठरवणारा एकही पुरावा समोर आलेला नाही.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT