Imran Khan News
Imran Khan News Sarkarnama
देश

Imran Khan News: माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर; तातडीने सोडा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सरकारनामा ब्यूरो

Pakistan Former PM Imran Khan: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यात आली होती.

त्यानंतर इस्लामाबाद न्यायालयाने इम्रान खान यांना 8 दिवसांची कोठडी सुनावली होती. मात्र, आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना मोठा दिलासा दिला आहे.

इम्रान खान यांची अटक ही पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. तसेच इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इम्रान खान यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची कोठडी सुनावली होती. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. इम्रान खान यांची अटक वैध ठरवणारा इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवत त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले. न्यायालय या प्रकरणावर खूप गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून अटक कशी काय केली जाऊ शकते, असा सवाल न्यायालयाने यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, इम्रान खान यांना केलेली अटक ही बेकायदेशीय असून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT