Nitish Kumar, Tejashwi Yadav Sarkarnama
देश

Nitish Kumar : एकाच मतदारसंघात पोटनिवडणूक, तरीही किंगमेकर ठरलेल्या नितीशबाबूंनी ताकद लावली पणाला...

Bihar Assembly Bypoll Tejashwi Yadav RJD JDU : बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातील रुपौली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

Rajanand More

Patna : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने आपली ताकद दाखवून दिली. निवडणुकीत पक्षाला बारा जागा मिळाल्याने केंद्रात किंगमेकर बनले. पण बिहारमधील एकाच मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातील रुपौली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी (10 जुलै) मतदान होणार आहे. या मतदारसंघात नितीशबाबूंनी कलाधर मंडल यांना तिकीट दिली आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) माजी आमदार बीमा भारती यांना रिंगणात उतरवलं आहे.

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी ही निवडणूक पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात आहे. मागील निवडणुकीत बीमा भारती या जेडीयूच्या तिकीटावर या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पण लोकसभा निवडणुकीआधी त्या आरजेडीमध्ये आल्या. त्यांना पूर्णिया मतदारसंघाचे तिकीट मिळाले, पण त्यांचा पराभव झाला.

आमदारकीचा राजीनामा दिलेल्या बीमा भारती यांनाच आरजेडी पुन्हा पोटनिवडणुकीत तिकीट दिले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा जेडीयूची असल्याने पुन्हा मिळवण्यासाठी पक्षाने ताकद लावली आहे.

लोकसभा निवडणुकीत आरजेडीला केवळ चार जागा मिळाल्या असल्या तरी इंडिया आघाडीच्या एकूण दहा जागा आहेत. त्यामुळे रुपौलीमध्ये पुन्हा एकदा एनडीए विरुध्द इंडिया आघाडी असा सामना आहे. या मतदारसंघात जातीचे समीकरण महत्वाचे मानले जात आहे. दोन्ही उमेदवार एकाच समाजाचे असले तरी मतदार कुणाच्या बाजूने उभे राहणार, याबाबत उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडियाने चांगली कामगिरी केल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ‘एनडीए’तील पक्षांना धडकी भरली आहे. त्यामध्ये बिहारचाही समावेश आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी जेडीयूची ही परीक्षा ठरणार असून आरजेडीसाठीही हा विजय महत्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT