Rahul Gandhi : राहुल गांधींना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी! भाजप नेत्याची धमकी

BJP MLA Bharat Shetty Controversy Parliament : भाजप आमदार भरत शेट्टी यांनी केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Karnataka : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संसदेतील हिंदूबाबतच्या विधानावरून अजूनही वाद सुरू आहे. भाजप आमदाराने यावरून राहुल गांधींना कानशिलात मारण्याची धमकी दिली आहे. त्यांना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

कर्नाटकातील भाजप आमदार भरत शेट्टी यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नसल्याचे विधान केले होते. त्यावरून भाजपने राहुल गांधी सर्व हिंदूंना हिंसक म्हणाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांचा विरोध होत आहे.

Rahul Gandhi
Narendra Modi in Russia : रशियाच्या दौऱ्यात मोदींना पहिलं मोठं यश; ‘चाय पे चर्चा’ अन् ‘तो’ निर्णय...

भरत शेट्टी म्हणाले, राहुल गांधींच्या अशाप्रकारच्या विधानांसाठी त्यांना संसदेत बंद करून कानशिलात मारायला हवी. ते मंगलुरूमध्ये आले तर आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण व्यवस्था करू. संसदेत कानशिलात मिळाल्यानंतर आमचे विरोधी पक्षनेते ठीक होतील, अशी धमकी शेट्टी यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते संसदेत भगवान महादेव यांचा फोटो घेऊन आले. त्यांनी तिसरा डोळा उघडला तर विरोधी पक्षनेत्यांची राख होईल, हे त्यांना माहिती नाही. त्यांचे धोरण नेहमीच हिंदूविरोधी असते. त्यामुळे ते पूर्णपणे वेडे असल्याचे स्पष्ट होते, असे वक्तव्य शेट्टी यांनी केले आहे.

Rahul Gandhi
BJP MP's Rally : खासदारकी जिंकली अन्‌ दारू वाटून आनंदोत्सव साजरा केला; भाजप खासदाराच्या सभेतील व्हिडिओ व्हायरल

हिंदू धर्म आणि संस्थांचे रक्षण करणे हे भाजपचे कर्तव्य आहे. अशा नेत्यांमुळे हिंदूंना अडचणींचा सामना करावा लागतो. हिंदू आपल्या घरातूनही बाहेर येणार नाही, अशी स्थिती ते निर्माण करतील. ते वेळेनुसार आपला धर्म बदलतात. तमिळनाडूत गेल्यानंतर ते नास्तिक असतात. गुजरातमध्ये भगवान महादेवाचे भक्त बनतात, अशी टीका शेट्टी यांनी राहुल गांधींवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com