PM Modi: बिहारमध्ये एनडीए सरकारनं जोरदार मुसंडी मारली असून २०२ जागा जिंकत दणक्यात सेलिब्रेशनही सुरु केलं आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राजदला यांच्या महागंठबंधनला इशारा दिला. बिहारमध्ये आता कट्टा सरकार परत येणार नाही, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
मोदी म्हणाले, आज बिहारच्या घराघरात मखान्याची खीर बनवण्याचं पक्क झालं आहे. मला याचाही आनंद आहे की इथं देखील मखान्याची खीर सर्वांना खाऊ घातली आहे. आम्ही एनडीएचे लोक जनतेचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीनं जनतेला खूश ठेवत असतो, आम्ही तर जनतेचं हृदयात बसलो आहोत. त्यामुळेच आज संपूर्ण बिहारनं दाखवून दिलं आहे की, फिर एक बार एनडीए सरकार.
मी बिहारच्या प्रचारात वारंवार जंगल राजची आणि कट्टा सरकारची गोष्ट करायचो तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे लोक कधीही विरोध करत नव्हते. पण काँग्रेसवाल्यांना हे खूपच बोचायचं. ते म्हणायचे की मोदी काय म्हणत आहेत. पण मी आज पुन्हा सांगू इच्छितो की, आता पुन्हा परत येणार नाही कट्टा सरकार. मित्रांनो बिहारच्या लोकांनी विकसित बिहारसाठी मतदान केलं आहे.
दरम्यान, मोदी पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राजदनं छटी मैय्याचा अपमान केला होता. पण अद्याप त्यांनी माफी मागितलेली नाही. बिहारचे लोक हे कधीही विसरणार नाही. बिहारचा अभिमान आणि सन्मान हे आमचं प्राधान्य आहे. बिहारच्या लोकांचा भारताच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. पण ज्यांनी देशावर दशकांपर्यंत राज्य केलं, त्यांनी कायम बिहारची खोटी प्रतिमा उभी केली. त्यांनी कायम बिहारचा अपमान केला. त्यांनी कधीही बिहारच्या गौरवशाली इतिहासच नव्हेतर त्यांच्या संस्कृतीचं आणि परंपरांचा आदर केला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात,"या निवडणुकीमुळे भारतीय निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढलेले मतदान, वंचित आणि शोषितांचे वाढलेले मतदान हे निवडणूक आयोगासाठी एक महत्त्वपूर्ण यश आहे. हा तोच बिहार आहे जिथे एकेकाळी माओवादी दहशतीचे वर्चस्व होते. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजता मतदान संपत असे. पण या निवडणुकीत बिहारमधील लोकांनी निर्भयपणे, उत्साहाने आणि उत्साहाने मतदान केले आहे. जंगल राजच्या काळात बिहारमध्ये काय घडायचे हे तुम्हाला माहिती आहे. मतदान केंद्रांवर उघडपणे हिंसाचार होत असे. मतपेट्या लुटल्या जात. आज त्याच बिहारमध्ये विक्रमी मतदान होत आहे. ते शांततेत मतदान करत आहे. प्रत्येकाचे मतदान नोंदवले गेले आहे. प्रत्येकाने त्यांच्या आवडीनुसार मतदान केले आहे"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.