NCP leaders reviewing Bihar Assembly election results as reports indicate possible deposit loss for Ajit Pawar’s candidates. sarkarnama
देश

Bihar Election : बिहारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सुपडासाफ; 14 उमेदवारांना मिळाली धक्कादायक मते

Ajit Pawar’s NCP Candidates Underperforms : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार उतरवले होते. पण सर्व ठिकाणी या उमेदवारांचे पानिपत झाले आहे.

Rajanand More

Bihar Assembly Election Results: Overview : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने आगेकुच सुरू आहे. मागील २० वर्षांपासून नितीश कुमार यांचा करिष्मा कायम असल्याचे या विजयाने शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपसह एनडीएतील सर्व पक्षांनी दमदार कामगिरी केली आहे.

केंद्र सरकारसह महाराष्ट्रात एनडीएसोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बिहारमध्ये उमेदवार उतरवले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच बिहारची निवडणूक लढविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्ये ही पहिलीच निवडणूक आहे. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी बिहारममध्येही नशीब आजमावण्यात आले.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांची धुळधाण झाली आहे. राष्ट्रवादीच्या १४ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला हजार मतांचा आकडाही पार करता आलेला नाही. बहुतेक ठिकाणी नोटापेक्षाही कमी मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली आहे. अपक्ष उमेदवारही अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या पुढे असल्याचे सध्या चित्र आहे. अजितदादांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे.

महाराष्ट्रात भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहारमध्ये एकला चलोची भूमिका घेतली होती. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला आहे. राज्यात एकाही मतदारसंघात विजय तर सोडाच पण लक्षणीय मतेही मिळताना दिसत नाहीत. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यावर बिहारची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बिहारमधील १४ उमेदवार व आतापर्यंत त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे..

1.    डॉ. राशिद अझीम (नरकटियागंज) - 218

2. जयप्रकाश कुशवाह (नौतन) - 114

3. अमित कुमार कुशवाह (पिंपरा) - 821

4. सैफ अली खान (मनिहारी) - 730

5. विपिन कुमार पटेल (परसा) - 254

6. धर्मवीर महातो (सोनेपूर) - 65

7. अखिलेश कुमार ठाकूर (महुआ) - 288

8. अनिल कुमार सिंह (राघोपुर) - 241

9. विकास कुमार (बाखरी) - 234

10. अनिल सिंह (अमरपूर) - 121

11. आदिल आफताब खान (पाटणा साहीब) - 351

12. डॉ. भारती अनुराधा (मोहनिया) - 109

13. आशुतोष कुमार सिंह (सासाराम) - 110

14. मनोजकुमार सिंह (दिनोरा) - 161

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT