Nitish Kumar
Nitish Kumar sarkarnama
देश

Bihar Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला !

सरकारनामा ब्युरो

पाटणा : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर नितीशकुमार (nitish kumar) यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. (Bihar Cabinet Expansion news update)

नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार (Bihar Cabinet Expansion) येत्या १६ तारखेला (मंगळवार) होणार आहे. त्यासाठी तयारी सुरु आहे.

जदयू, राजद, कांग्रेस, भाकपासह लहान पक्षातील 30-32 जणांचा नव्या मंत्रीमंडळात समावेश असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव हे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. ते काल (शनिवार) रात्री पाटण्यात आले. त्यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मंत्रीमंडळात ३६ जणांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.

काँग्रेसने चार ते पाच मंत्रीपदे मागितली असल्याचे समजते. याबाबत काल दिल्ली येथे बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास यांनी पक्षश्रेष्ठींची चर्चा केली. विधानसभेतील काँग्रेसची सदस्यसंख्येनुसार त्यांच्या वाट्याला तीन पदे मिळतील, असे सुत्रांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांची निवड २५ आँगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. २४ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ठरल्याप्रमाणे राजदला विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार आहे, तर विधान परिषदेच्या सभापतीपदी जदयूला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार आहेत. महागठबंधनचे सरकार स्थापन करण्याआधी नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली. दोन वर्षांपूर्वीच भाजप आणि नितीशकुमार (जेडीयू पक्ष) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एसजेडी आणि भाजप यांच्यात वाद सुरू होता. हा वाद काही दिवसांपासून शिगेला पोहचला होता. नितीशकुमारांना अखेर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजद पक्षाला सोबत घेऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT