Rakesh Jhunjhunwala : 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे निधन

Rakesh Jhunjhunwala : 'अकासा' एअरलाइंसच्या माध्यमातून एव्हिएशन सेक्टरमध्ये एंट्री केली होती. 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे.
Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwalasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दलाल स्ट्रीटचे (Share bazar) 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफेट (Warren Buffett) म्हणूनही ओळखले जात होते. (rakesh jhunjhunwala passes away)

फोर्ब्सच्या यादीतील भारतीय श्रीमंतांच्या यादीत ते 48 व्या क्रमांकावर होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 2-3 आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

फक्त 5 हजार रुपयांपासून सुमारे 43.39 हजार कोटींचा पल्ला गाठणारे झुनझुनवाला यांनी 1992 च्या हर्ष मेहता घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून मोठा नफा मिळवला होता.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे शेअर बाजारातील नफा आणि तोट्याची अचूक जाण होती. यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असेही म्हटले जात होते. त्यांनी गेल्या आठवड्यातच 'अकासा' एअरलाइंसच्या माध्यमातून एव्हिएशन सेक्टरमध्ये एंट्री केली होती. 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे.

Rakesh Jhunjhunwala
Vinayak Mete : मराठा समाजाचा आवाज हरपला.. मेटेंच्या अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

झुनझुनवाला हे एक व्यापारी आणि सीए होते.हंगामा मीडिया आणि अ‍ॅपटेकचे ते चेअरमन देखील होते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. आज सकाळी 6.45 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावत असतानाही झुनझुनवाला कमाई करण्यात यशस्वी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com