Bihar Opposition Meet Sarkarnama
देश

Bihar Opposition Meet: भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची रणनीती ठरली; आजच्या बैठकीत काय ठरलं? नितीश कुमारांनी सांगितलं

Opposition Unity Meeting: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातील विरोधी पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

सरकारनामा ब्यूरो

Political News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. आज विरोधी पक्षांची महत्वाची बैठक बिहारमधील पटनामध्ये पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची भूमिका काय राहणार? यासह पुढील रणनीती ठरण्याबाबत चर्चा झाली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातील विरोधी पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जवळपास सर्वच विरोधीपक्षांचे महत्वाचे नेते हजर होते. विरोधकांची आज पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीकडे भाजपचे लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? विरोधकांची पुढील रणनीती काय असणार? याची सविस्तार माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली.

नितीश कुमार म्हणाले, "आज विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. यापुढील बैठकही ठरली आहे. आजच्या विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याबाबत एकमत झालं आहे. आता पुढील बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली १२ जुलै रोजी शिमल्यात होणार आहे. आगामी निवडणुकीत जागा वाटपांबाबतची चर्चा पुढच्या बैठकीत होणार आहे. त्याबरोबरच 'किमान समान कार्यक्रम' सध्या आम्ही तयार करत आहोत", असं नितीश कुमार यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत जवळपास सर्वच विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये राहुल गांधी, नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी, केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT