Balasaheb Thackeray Speech: पाटण्यात बैठक सुरु असताना महाराष्ट्रात लालू-मुलायमसिंहांवर टिका करणारा बाळासाहेबांचा व्हिडीओ व्हायरल

Balasaheb Thackeray Speech : भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे
Chitra Wagh Share Balasaheb Theckray Video
Chitra Wagh Share Balasaheb Theckray Video
Published on
Updated on

"Chitra Wagh Tweet On Patna Opposition Meeting : देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकाच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची आज बिहारमध्ये महाबैठक सुरु आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नेतेमंडळींनी उपस्थिती लावली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित आहेत.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात बाळासाहेब ठाकरे यांनी समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर सडकून टिकाही केली आहे. हाच व्हिडीओ शेअर करत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Chitra Wagh Share Balasaheb Theckray Video
NCP State President News : राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी करण्याच्या हालचालींत सर्वांच्या नजरा नागपूरकडे !

"उद्धव जी बाळासाहेबांचा हा व्हीडीओ पाहा… यात बाळासाहेबांनी लालू प्रसाद यादवला काय म्हटलं होतं ते ऐका. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल… बाळासाहेबांच्या भाषेत “तोंडात चारा भरलेला, म्हशीजवळ लोळणारा लालू..” बाळासाहेबांनी लालूला नालायक म्हटलं होतं… आता अशा नालायका समोर लोटांगण घालण्याची वेळ तुमच्यावर आली. देवेंद्र फडणवीसजी उगाच नाही म्हणाले तुम्हाला…खरंच काय होतास तू काय झालास तू.." असं ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray ) निशाणा साधला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही महिन्यात त्यांनी देशभरातील विरोधी पक्षनेत्यांच्यी गाठीभेटीही घेतल्याचे पहायला मिळाले. याच पार्श्वभू्मीवर देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, एम. के. स्टॅलिन, अशा अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com