Nitish Kumar Death Threat News : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुजरातमधून त्यांना ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधक गटाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नीतीश कुमार यांच्याकडे पाहिले जाते.
नीतीश कुमार यांनी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला सुरत येथून अटक करण्यात आली आहे. बिहार पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली आहे,
नीतीश कुमार यांना व्हाटस्अॅपवरुन ( WhatsApp) धमकी देण्यात आली होती. बिहार पोलिसांनी त्यांची ओळख लपवली आहे. बिहार पोलिस हे गुजरात येथे पोहचले आहेत. त्याची चौकशी सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.