Third Front for 2024: तिसऱ्या आघाडीसाठी केजरीवाल करणार सात मुख्यमंत्र्यांची मनधरणी...

Third Front for 2024 Arvind Kejriwal : आठ पक्ष तिसऱ्या आघाडीत येत आहेत.
Arvind Kejarival
Arvind KejarivalSarkarnama
Published on
Updated on

Third Front for 2024 Arvind Kejriwal : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजून एक वर्ष बाकी आहे, पण पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख स्थापित करण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्नशील आहे. भाजपच्या विरोधात एक मजबूत विरोधी पक्ष तयार करण्यासाठी काँग्रेसला सोडून अन्य विरोधक एकत्र येत आहे. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहे.

एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार विरोधकांना एकत्र करण्यासाठी सरसावले आहेत तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. आम आदमी पक्ष, टीएमसी, बीआरएस, आरजेडी, सपा, एनसीपी, नॅशनल कॉन्फ्रेंस, शिवसेना (ठाकरे गट) हे आठ पक्ष तिसऱ्या आघाडीत येत आहेत.

गैरभाजप-काँग्रेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्यासाठी केजरीवालांनी बाह्या सरसावल्या आहेत. या राज्यातील मुख्यमंत्र्यांना केजरीवाल यांनी भोजनाचे निमंत्रण दिले होते. या मुख्यमंत्र्यांकडून त्यांना अद्यापपर्यंत फक्त आश्वासन मिळाले आहे.

Arvind Kejarival
Uddhav Thackeray News: सत्तेची बेकायदा गढी उद्ध्वस्त करा; खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारा !

केजरीवाल या सात मुख्यमंत्र्यांना एकत्र करुन मोदी सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यासाठी केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आदींना पत्र पाठवले होते.

तेलगंणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनाही याचे निमंत्रण देण्यात आले होते. पण प्रकृती बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही, पण विरोधकांचे नेतृत्व करण्यासाठी नीतीश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे.

Arvind Kejarival
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये 'आप' बिघडवणार भाजप, काँग्रेसचा खेळ ; या बड्या नेत्यांना उमेदवारी

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही भेट घेणार आहेत. तिसरी आघाडी मजबूत बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

काँग्रेसला विरोधी पक्षाचा प्रमुख म्हणून हटविण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु आहे. मोदी सरकारला हटविण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत, पण त्यांनी काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सपाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार, नँशनल कॉन्फ्रेंसचे फारूक अब्दुल्ला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com