Bihar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्या विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी थेट IAS अधिकाऱ्यासमोर हात जोडत त्यांच्या पाया पडण्याची भाषा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तुमच्या पाया पडतो, भूमी सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करा, असे विधान त्यांनी केले आहे.
पटना येथील एका कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेल्या अधिकाऱ्यांसमोर नितीश कुमार यांनी हात जोडल्याचे चर्चांना उधाण आले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कुमार असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे. नितीश कुमार यांनी भूमी सर्वेक्षणावर व्यासपीठावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली.
जुलै 2025 पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे, यासाठी नितीश कुमार आग्रही असल्याचे दिसून आले. सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या 9 हजार 888 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. मी तुमच्यासमोह हात जोडून प्रार्थना करतो, हवे तर पाया पडतो. पण जुलै 2025 पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवे. हे काम पूर्ण झाले असते तर किती आनंद झाला असता, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भूमी सर्वेक्षणासाठी जुलै 2025 ची डेडलाईन दिल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोर जाण्याचा निर्णय संयुक्त जनता दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकांची नाराजी असलेली कामे निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांचा आग्रह आहे.
भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मात्र पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जेडीयू आणि भाजप आमनेसामने आले आहे. नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जागा तिप्पट आहेत. तरीही नितीश कुमार मुख्यमंत्री असल्याने भाजपचे काही नेते नाराज आहेत. आगामी निवडणुकीत स्वबळावर लढल्यास भाजपचा मुख्यमंत्री असेल, असा विश्वास या नेत्यांना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.