Britain Election Result : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का! किअर स्टार्मर यांची प्रचंड बहुमताकडे वाटचाल

Rishi sunak Vs keir starmer :एक्झिट पोलमध्ये ऋषी सुनक यांच्या पक्षाला 131 जागा तर, किअर स्टार्मर यांच्या लेबर पक्षाला 410 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते.
Rishi Sunak
Rishi Sunaksarkarnama

Britain Election Result : ब्रिटनच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सुरुवातीच्या निकालामध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा मोठा पराभव होताना दिसतो आहे. 650 जागांपैकी 100 पेक्षा अधिक जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये किअर स्टार्मर यांच्या लेबर पक्षाला 102 जागा तर, सुनक यांच्या पक्षाला केवळ 9 जागा मिळाल्या आहेत.

ब्रिटनच्या संसदेत (हाऊस ऑफ काॅमन्स) मध्ये बहुमतासाठी 326 जागांची आवश्यकता आहे. पंतप्रधान सुनक यांच्या पक्षाचा पराभव होत असल्याचे दिसत असताना पंतप्रधान सुनक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

एक्झिट पोलमध्ये ऋषी सुनक Rishi Sunak यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. सुनक यांच्या पक्षाला 131 जागा तर, किअर स्टार्मर यांच्या लेबर पक्षाला 410 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. हे अंदाज खरे ठरताना सुरवातीच्या निकालामधून दिसत आहेत.

Rishi Sunak
Modi Government Breaking : मोदी सरकारची धाकधूक वाढली; संकटकाळात भाजपच्या मदतीला कायम धावून येणारा 'हा' पक्ष साथ सोडणार...

14 वर्षात 5 पंतप्रधान

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष 14 वर्षांपासून सत्तेत आहे. या काळात ब्रिटनच्या तब्बल पाच पंतप्रधान झाले. 2010 मध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षांनी विजय मिळवल्यानंतर डेव्हिड कॅमेरून पंतप्रधान झाले. त्यानंतर, 2015 कंझर्व्हेटिव्ह पक्षाने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि कॅमेरून पुन्हा पंतप्रधान बनले. मात्र 2016 मध्ये त्यांना हे पद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी तेरेसा मे यांना पंतप्रधान झाल्या. 2019 पर्यंत त्या या पदावर होत्या. 2019 मध्ये बोरिस जॉन्सन यूकेचे पंतप्रधान झाले. मग मध्येच त्यांना पायउतार व्हावे लागले आणि लिझ ट्रस पंतप्रधान झाले. मात्र त्या पदावर फक्त 50 दिवस राहू शकल्या. त्यांच्या जागी ऋषी सुनक पंतप्रधान झाले होते.

Rishi Sunak
Congress Politics : काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला, निवडणूक स्वबळावर लढणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com