Nitish Kumar Sarkarnama
देश

Nitish Kumar News : नितीश कुमार यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती अस्थिर! एका व्हिडीओने नेत्यांना वाटू लागली चिंता...

Nitish Kumar Viral Video Viral Political Videos India : नितीश कुमार यांच्या शेजारी राज्याचे प्रधान सचिव दीपक कुमार होते. राष्ट्रगीत सुरू असतानाच नितीश कुमार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.

Rajanand More

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर चोहोबाजूने टीका होऊ लागली आहे. राष्ट्रगीत सुरू असताना शेजारी शांततेत उभ्या असलेल्या प्रधान सचिवांना उकसावणे, समोर हात जोडून नमस्कार करणे, इतरत्र पाहणे... हा नितीश कुमारांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती स्थिर नसल्याचा मोठा दावा विरोधकांनी केला आहे.

नितीश कुमार यांचा बिहारमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना व्यासपीठावर नितीश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व इतर काही जण दिसत आहे. नितीश कुमार यांच्या शेजारी राज्याचे प्रधान सचिव दीपक कुमार होते. राष्ट्रगीत सुरू असतानाच नितीश कुमार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण दीपक कुमार यांच्याकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न होत होते.

नितीश कुमार यांची ही कृती पाहून दीपक कुमार त्यांना सरळ उभे राहण्याचा इशारा करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करत नितीश कुमार समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला हात जोडून नमस्कार करतात. त्यानंतर इतरत्र पाहू लागतात. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले.

माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी नितीश कुमार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नितीश कुमार यांचे डोके ठिकाणावर नसल्याची टीकाही त्यांनी केली. विधान परिषदेत जोरदार हंगामा झाल्यानंतर कामकाज स्थगित करावे लागले. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांची मानसिक आणि शारिरीक स्थिती स्थिर नसल्याची टीका केली आहे.

यादव यांनी म्हटले आहे की, कमीत कमी राष्ट्रगीताचा अपमान तरी नका करू. युवक, विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठांचा अपमान तुम्ही रोज करत आहात. कधी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनी टाळ्या वाजवता, तर कधी राष्ट्रगीताचा अपमान करता. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री असल्याचे आठवण करून देतो. तुम्ही काही सेंकदही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्थिर नाही. अशा स्थितीत या पदावर राहणे राज्यासाठी अतिचिंताजक बाब आहे. बिहारला असे वारंवार अपमानित करू नका.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT