Yashwant Varma: न्यायव्यवस्था हादरली!न्यायाधीशांच्या घरी आढळले नोटांचा ढीग ; सुप्रीम कोर्टानं उचललं 'हे' पाऊल

Delhi High Court Judge Yashwant Varma Cash Seizure: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घरी नोटांचे ढीग आढळले आहेत. त्यांची बदली करण्यात आली आहे,
Delhi High Court Judge Yashwant Varma Cash Seizure
Delhi High Court Judge Yashwant Varma Cash SeizureSarkarnama
Published on
Updated on

न्यायाधीशांच्या निवासस्थानाला लागलेली आग विझवण्यास गेलेल्या अग्मिशामक दलाच्या जवानांच्या हाती कोट्यवधीचं घबाड लागलं आहे. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आहे. न्यायाधीशांच्या घरी बेहिशेबी कोट्यवधींची रोकड आढळल्याने न्याय व्यवस्था हादरली आहे. सुप्रीम कोर्टानं या घटनेवर कठोर पावलं उचलण्यास सुरवात केली आहे.

न्यायाधीशांच्या घरी बक्कळ कॅश आढळल्याने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. संबधीत न्यायाधीशांची दुसरीकडे उचलबांगडी करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घरी नोटांचे ढीग आढळले आहेत. त्यांची बदली आता अलाहाबाद येथे करण्यात आल्याची माहिती आहे.

यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली तेव्हा ते बाहेर गावी होते. आगीची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस आणि अग्निशमक दलाला दिली. पोलिस त्यांच्या घरी आग आटोक्यात आणण्यासाठी आले तेव्हा त्यांना एका खोलीमध्ये कोट्यवधींची रक्कम दिसली, ही रक्कम बेकायदा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी केंद्रीय गुन्हे शाखा (सीबीआय) आणि ईडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Delhi High Court Judge Yashwant Varma Cash Seizure
Nagpur Violence: नागपुरची दंगल कुणामुळे ? मौलानांनी लिहिलं अमित शहांना पत्र

या घटनेनंतर ही माहिती देशाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या कानावर घालण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर संजीव खन्ना यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बैठक बोलावली. यशवंत वर्मा यांची लगेचच बदली करण्यात आली. त्यांना अलाहाबाद येथे पाठवण्यात आले आहे. न्यायाधीश वर्मा हे यांची येथून तीन वर्षापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.

या गंभीर प्रकरणानंतर वर्मा यांची नुसती बदली करुन चालणार नाही, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वकीलांनी केली आहे. त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे समजते. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची विभागीय चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यशवंत वर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. आता त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश येथे झाला आहे. त्यांनी आपले कायदाचे शिक्षण अलहाबाद येथून घेतले आहे. येथूनच त्यांनी आपल्या वकीली व्यवसायाची सुरवात केली होती.

त्यांनी महत्वपूर्ण खटल्याचे निकाल दिले आहेत. पारदर्शकपणे न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com