DGP Vinay Kumar Sarkarnama
देश

DGP VRS news : भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील पोलीस महासंचालकांची तडकाफडकी स्वेच्छानिवृत्ती; सरकारकडून काही तासांत शिक्कामोर्तबही

Vinay Kumar, Bihar DGP, Bihar Police, VRS Bihar DGP, Bihar IPS officer : स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या विनय कुमार यांच्यावर बिहार सरकारकडून राज्याचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Rajanand More

DGP voluntary retirement : मागील काही दिवसांपासून बिहारमध्ये तरूणींवर अतिप्रसंगाच्या धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस प्रशासन आणि सरकारवरही टीकेची झोड उठत आहे. देशभरात या घटनांवरून रोष व्यक्त केला जात असतानाच बिहारचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी विनय कुमार यांनी तडकाफडकी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

विनय कुमार हे नियमित सेवेतून डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. मात्र, दोन महिने आधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी २५ सप्टेंबर रोजीच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. बिहार सरकारने हा अर्ज तात्काळ प्रभावाने काही तासांतच मंजूरही केला आहे.

राज्याच्या गृह विभागाने शनिवारी रात्री उशिरा विजय कुमार यांच्या स्वेच्छानिवृत्तीबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसुचनेनुसार, १९९१ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी विनय कुमार हे प्रकृतीअस्वस्थ्यामुळे रजेवर होते. त्यांनी २५ सप्टेंबर रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी (VRS) अर्ज केला होता.

सरकारने हा अर्ज तातडीने मंजूर केला आहे. तीन महिन्यांची पूर्वसूचना देणे आवश्यक असलेला नियम शिथील करण्यात आला आहे. त्यानंतर कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली असल्याचेही अधिसूचनेत म्हटले आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या विनय कुमार यांच्यावर बिहार सरकारकडून राज्याचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विनय कुमार हे सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. त्यांची तब्ब्येत ठीक झाल्यानंतर माहिती आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत बिहारमध्ये जमुई, समस्तीपूर, दरभंगा या भागात अल्पवयीन मुली व तरुणींच्या विनयभंगाच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्याचे व्हिडिओही समोर आले होते. त्यामुळे बिहारमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT