Gyanesh Kumar news : ज्ञानेश कुमारांनी दिली भाजपकडून लोकसभा तिकीटाची ऑफर; माजी मुख्य सचिवांनी उडवून दिली खळबळ

Jiji Thomas, Kerala Chief Secretary, Chief Election Commissioner, Election Commission controversy : ज्ञानेश कुमार हे २०१६ मध्ये केरळ सरकारचे निवासी आयुक्त म्हणून दिल्लीत कार्यरत होते. त्यावेळी ओमान चंडी हे केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांनीच ज्ञानेश कुमार यांची या पदावर नियुक्ती केली होती.
Chief Election Commissioner Gyanesh Kumar is at the centre of a fresh political controversy after former Kerala Chief Secretary Jiji Thomas made allegations regarding a 2016 BJP Lok Sabha ticket offer.
Chief Election Commissioner Gyanesh Kumar is at the centre of a fresh political controversy after former Kerala Chief Secretary Jiji Thomas made allegations regarding a 2016 BJP Lok Sabha ticket offer.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Lok Sabha ticket news : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठविलेले असतानाच आता माजी सनदी अधिकाऱ्याने धक्कादायक आरोप केले आहे. ज्ञानेश कुमार हे IAS अधिकारी असताना त्यांनी आपल्याला २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढण्यासाठी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट या अधिकाऱ्यांनी केला आहे.

केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉमस यांनी हे आरोप केले आहे. केरळमधील पत्तनम्तिट्टा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लढण्यासाठी तुम्ही इच्छूक आहात का, अशी विचारणा ज्ञानेश कुमार यांनी केल्याचा दावा थॉमस यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक मीडियाशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, केरळच्या मुख्य सचिवपदी असताना आम्ही दोघे एकाच विमानातून प्रवास करत होतो. यादरम्यान त्यांनी याबाबत विचारणा केली होती, मात्र, मी नकार दिला होता.

थॉमस यांनी ज्ञानेश कुमार यांनी आपण राजकारणात येण्यासाठी नंतर आपले मन वळविण्याचा प्रयत्न केला होता, असाही दावा केला आहे. थॉमस यांनी दावा केलेलाहा प्रसंग २०१६ मधील आहे. पत्तनम्तिट्टा मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे उेमदवार अन्टो अँटोनी विजयी झाले होते. तर भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. थॉमस यांच्या या दाव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Chief Election Commissioner Gyanesh Kumar is at the centre of a fresh political controversy after former Kerala Chief Secretary Jiji Thomas made allegations regarding a 2016 BJP Lok Sabha ticket offer.
आमदार पाटलांची बातच न्यारी, पदाचा दोन महिन्यांत दोनदा राजीनामा

राहुल गांधी यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्ञानेश कुमार हे आयएएस अधिकारी असताना त्यांचा वापर भाजपसाठी भरती करण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर मोदी आणि शहा यांनी त्यांना अंपायर बनवले आणि भारतातील निवडणुकांमध्ये 'मॅच-फिक्सिंग' करण्याची जबाबदारी सोपवली.

Chief Election Commissioner Gyanesh Kumar is at the centre of a fresh political controversy after former Kerala Chief Secretary Jiji Thomas made allegations regarding a 2016 BJP Lok Sabha ticket offer.
तुमची केस 'आयाराम, गयाराम अन् आयाराम'! पक्षांतरावर कोर्टही बोलले, कोण आहे हा नेता?

ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या तुकडीचे केरळ केडरचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी आयआयटी कानपूर मधून बी. टेक. पदवी प्राप्त केली आहे. फेब्रुवारी २०२५ पासून ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. ते २०१६ मध्ये केरळ सरकारचे निवासी आयुक्त म्हणून दिल्लीत कार्यरत होते. त्यावेळी ओमान चंडी हे केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांनीच ज्ञानेश कुमार यांची या पदावर नियुक्ती केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com