Bihar Assembly Election 2025 Sarkarnama
देश

Bihar Election 2025: बिहारमध्ये भाजपची मोठी खेळी! 10 विद्यमानसह माजी आमदारांना दाखवला घरचा रस्ता; कारण जाणून घ्या

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे.

Amit Ujagare

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजप १०० जागा लढवणार आहे. त्यामुळं ७१ जागांची पहिली यादी भाजपनं जाहीर केली आहे. लवकरच उर्वरित २९ जागांसाठीची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. पण पहिल्याच यादीत भाजपनं मोठी खेळी केल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी विद्यमान आमदारांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. तर काही माजी आमदारांना देखील झटका दिला आहे. याची कारणंही भाजपनं स्पष्ट केली आहेत.

भाजपनं पहिल्या ७१ जागांच्या यादीतून १० विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं आहे. तर काही माजी आमदारांना देखील तिकीट नाकारण्यात आलं आहे. दरभंगा जिल्ह्यातील गौडाबौराम विधानसभा मतदारसंघातील आमदार सवर्णा सिंह यांच्याऐवजी त्यांचे पती आणि माजी आयकर अधिकारी सुजीत सिंह यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.

दोनच दिवसांपूर्वी (१३ ऑक्टोबर) सुजीत सिंह यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्याचबरोबर त्याच दिवशी सीतामढी मतदारसंघातील जेडीयूचे माजी खासदार सुनील कुमार पिंटू यांना पक्षानं आमदारकीसाठी संधी दिली आहे. भाजपनं आपल्या आठ आमदारांची तिकीटं कापली यामध्ये रीगा मतदारसंघाचे आमदार मोतीलाल प्रसाद, औराईचे आमदार रामसूरत राय, राजनगरचे रामप्रीत पासवान, कुम्हरारचे अरुण सिन्हा, पाटणा साहिब विधानसभा नतदारसंघातील आमदार नंदकिशोर यादव, कटोरिया हम्बरम, नरपतगंज इथून जयप्रकाश यादव या नावांचा समावेश आहे.

विद्यमान आमदारांची तिकीटं का कापली त्याचंही कारण समोर आलं आहे. याबाबत भाजपनं महत्वाचा निर्णय घेतला आहे की बिहारमध्ये तिकीटं कापण्यामागे इतर काही कारणं आहेत. तसंच काही जागांवर अँटिइम्कमबन्सी तयार झाल्यानं तिथला उमेदवार बदलणं गरजेचं होतं. त्याचबरोबर खासगी कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, पक्षानं मोठ्या संख्येनं विद्यमान आमदारांना तिकीटनं नाकारली आहेत. मधुबनी जिल्ह्यातील राजनगरचे आमदार रामप्रीत पासवान यांच्याऐवजी स्थानिक कार्यकर्ता सुजीत पासवान यांना तिकीट देऊन भाजपनं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT