बिहारच्या मिथिलांचल, मगध, शहाबाद, सीमांचल, तिरहुत आणि सारण या सर्व विभागांमध्ये NDA ने मोठं यश मिळवलं.
2020 साली RJD-काँग्रेसने या भागांत 110 पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदा त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली.
सर्व विभागांमध्ये महाआघाडीचा प्रभाव कमकुवत होताना दिसला आणि NDA ला स्पष्ट बहुमत मिळाले.
Bihar Election News : नुकताच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागला असून येथे एनडीएचा मोठा विजय तर महागठबंधनला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 243 जागांपैकी एनडीए 202 जागांवर दणदणीत विजय मिळाला असून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील विरोधी ‘महागठबंधन’ला जेमतेम ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळवता आलेल्या नाहीत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळा फोडता आला नाही. यामुळे आता पुन्हा एकदा बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल अशी चर्चा सुरू आहे.
तर 2020 मधील विधानसभा निवडणुकीत बिहारच्या मिथिलांचल, मगध, शहाबाद, सीमांचल, पूर्व बिहार, तिरहुत आणि सारण या सर्वच विभागांमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसने 110 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. तिथेच आता ‘एनडीए’ने मोठे यश मिळवले असून ‘महाआघाडी’ची येथील कामगिरी निराशाजनक झाल्याचे समोर आले आहे.
सीतामढी
सीतामढी जिल्ह्यातील आठ जागांवर ‘एनडीए’ आघाडीवर आहे. सीतामढीमधून भाजपचे उमेदवार सुनील कुमार पिंटू, बिहारमधून भाजपच्या उमेदवार गायत्री देवी, बथनहा येथून भाजपचे उमेदवार अनिल कुमार, रुन्नीसादपूरमधून ‘जेडीयू’चे पंकज कुमार, सुरसंदमधून ‘जेडीयू’चे नागेंद्र रावत, बाजपट्टीमधून ‘राष्ट्रीय लोकमोर्चा’चे रामेश्वर महतो, बेलसंदमधून ‘लोकजनशक्ती पक्षा’चे अमित कुमार आणि रीगा येथून भाजपचे बैद्यनाथ प्रसाद विजयी झाले आहेत. शिवहरमधून ‘जेडीयू’च्या डॉ. श्वेता गुप्ता विजयी झाल्या.
वैशाली
राघोपूरमधून सतत पिछाडीवर राहिलेल्या तेजस्वी यादव यांनी अखेर मतमोजणीत आघाडी घेतली व त्यांना यश मिळाले. ‘महाआघाडी’ची एकमेव मोठी कामगिरी वैशाली जिल्ह्यात पाहायला मिळाली. ‘एनडीए’च्या उमेदवारांनी हाजीपूर, महुआ, वैशाली, राजपक्षे, लालगंज, महनार व पाटेपूरसह बहुतांश जागा जिंकल्या.
पूर्व चंपारण
पूर्व चंपारणमध्ये मोतिहारी, नरकटियागंज, ढाका, मधुबन, चिरैया आणि हरसिद्धीत भाजपने विजय मिळवला. सुगौली आणि गोविंदगंजमध्ये लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास पासवान) उमेदवार आघाडीवर आहेत. पश्चिम चंपारणमध्ये भाजपला सात आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.
सीमांचल
सीमांचलमधील अरारिया, पूर्णिया, कटिहार आणि किशनगंज जिल्ह्यांमध्ये राजद आणि काँग्रेसव्यतिरिक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नुकसान झाले. कटिहार जिल्ह्यातील बलरामपूर येथे ओवैसींच्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला 80 हजार मते मिळाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महबूब आलम यांना 79 हजार मते मिळाली. लोकजनशक्ती पक्षाच्या संगिमा डेगी यांना 80, 400 मते मिळाली. किशनगंजमध्ये एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले.
मिथिलांचल
मिथिलांचलमधील दरभंगा व मधुबनी या दोन जिल्ह्यांतील एकूण 20 जागांमध्ये महाआघाडीला मोठा फटका बसला. राष्ट्रीय जनता दलाने मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी मतदारसंघात विजय मिळवला. उर्वरित जागांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मधुबनीमध्ये माजी उद्योगमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे समीर महासेठ यांचा 20 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून गायिका मैथिली ठाकूर विजयी झाल्या असून त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या आहेत.
FAQs :
1. NDA ला बिहारच्या सर्व विभागांत यश का मिळाले?
→ संघटन दृढ असणे, स्थानिक मुद्द्यांवर लक्ष आणि मतदारांमध्ये सरकारविषयी समाधान ही प्रमुख कारणे आहेत.
2. 2020 च्या तुलनेत महाआघाडीची कामगिरी एवढी का घसरली?
→ अंतर्गत कलह, स्पष्ट नेतृत्वाचा अभाव आणि जनतेशी कमी संवाद या गोष्टींचा परिणाम झाला.
3. कोणत्या विभागांत NDA ची सर्वाधिक आघाडी होती?
→ मिथिलांचल, सीमांचल आणि मगध येथे NDA ची आघाडी स्पष्ट होती.
4. RJD आणि काँग्रेसची जागा कमी होण्याची कारणे कोणती?
→ संघटनातील कमतरता, उमेदवार निवडीतील चुका आणि स्थानिक पातळीवरील मतभेद.
5. पुढील निवडणुकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
→ NDA चा आत्मविश्वास वाढेल आणि महाआघाडीला संघटन पुनर्रचना करून रणनीती बदलावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.