Mukesh Sahani Father Murder  sarkarnama
देश

Mukesh Sahani Father Murder : खळबळजनक! माजी मंत्र्याच्या वडिलांची धारदार शस्त्रानं हत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह...

Mukesh Sahani's Father Murdered in Darbhanga : मुकेश साहनी हे मुंबईत असून वडिलांच्या हत्येची माहिती मिळताच ते बिहारला रवाना झाले आहेत. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह घरातून ताब्यात घेतल्याची माहिती दरभंगाचे पोलिस अधीक्षकांनी यांनी दिली आहे.

Akshay Sabale

Jeetan Sahani Murder : बिहारमध्ये माजी मंत्र्याच्या वडिलांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विकासशील इन्सान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि बिहारचे माजी मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांची हत्या करण्यात आली आहे.

धारदार शस्त्रानं जीतन साहनी यांच्यावर वार करण्यात आले. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत बेडवर आढळून आला.

जीतन साहनी यांचं घर दरभंगातील सुपौल बाजार येथील अफजला पंचायतमध्ये आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहे. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह घरातून ताब्यात घेतल्याची माहिती दरभंगाचे पोलिस अधीक्षक जगुनाथ रेड्डी यांनी दिली आहे.

घटनेवेळी जीतन साहनी घरात एकटेच होते. त्यावेळी काही अज्ञातांनी घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला (Murder) केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वैयक्तिक कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.

मुकेश साहनी हे मुंबईत (Mumbai) असून वडिलांच्या हत्येची माहिती मिळताच ते बिहारला रवाना झाले आहेत. जीतन साहनी घरात एकटेच राहत होते. सर्व मुले बाहेर राहतात. त्यांना मुकेश साहनी आणि संतोष साहनी अशी दोन मुले आहेत. एक मुलगी देखील आहे. तिचे लग्न झाले असून ती देखील मुंबईत राहते.

मुकेश साहनी हे विकासशील इन्सान पक्षाचे संस्थापक आहे. त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी 'इंडिया' आघाडीत सामील झाला होता. ते बिहारचे (Bihar) माजी पशुसंवर्धन आणि मत्स्य संसाधन मंत्री राहिले आहेत. त्यासह लोकसभा निवडणुकीत मुकेश साहनी यांनी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह अनेक जाहीर सभा घेतल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT