Modi and Nitish Kumar Sarkarnama
देश

Bihar NDA alliance : बिहारमध्ये 'NDA'तील मोठा भाऊ कोण? ; विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला जवळपास निश्चित!

Bihar NDA seat sharing formula almost final for assembly election : बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा असून, या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Mayur Ratnaparkhe

Bihar Assembly Election NDA Seat Sharing : आगामी काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये जागा वाटपाबाबतच्या हालचालींना वेग आलेला आहे. सत्ताधारी आघाडीत जागा वाटपाच्या सूत्रावर जवळजवळ एकमत झाले आहे आणि ते लोकसभा निवडणुकीत स्वीकारलेल्या सूत्रावर आधारित असेल असे मानले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये तिकीटवाटप लोकसभा निवडणकीच्या सूत्रानुसारच होईल. लोकसबा निवडणुकीत भाजपने १७, जेडीयूने १६, एलजेपीने पाच जागांवर आणि जीतनराम मांझी यांच्या एचएएम व उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाने प्रत्येकी एक जागेवर निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूपेक्षा एका जास्त जागेवर निवडणूक लढवली, परंतु विधानसभेत जेडीयू भाजपपेक्षा एक किंवा दोन जागा जास्त घेत निवडणूक लढवू शकते.

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू १०२ ते १०३ जागांवर व भाजप १०१ ते १०२ जागांवर निवडणूक लढवू शकते. उर्वरित अंदाजे ४० जागा लोक जनशक्ती पार्टी, हिंदुस्तान अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांना दिल्या जातील.

जागावाटपात लोकसजनशक्ती पक्षाचा वाटाही मोठा असेल, कारण त्यांचे पाच खासदार आहेत. या संदर्भात त्यांना जवळपास २५ ते २८ जागा मिळू शकतात. तर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाला सहा ते सात जागा व उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला ४ ते पाच जागा मिळू शकतात.

एनडीएच्या या जागावाटप सूत्रावरून हे स्पष्ट होते की, युतीमधील मोठ्या पक्षांसह लहान मित्रपक्षांचाही समतोल साधण्याची तयारी आहे.तरी जागा वाटपाबाबत अंतिम घोषणा ही एनडीए नेत्यांच्या औपचारिक बैठकीनंतरच केली जाणार आहे.

२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत काय होते गणित? –

२०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात स्पर्धा होती. एनडीएमध्ये भाजपने ११० जागांवर उमेदवार उभा केले होते आणि ७४ जागा जिंकल्या तर जनता दल युनायटेडने ११५ जागांवर निवडणूक लढवली आणि ४३ जागा जिंकल्या होत्या. हिंदुस्थान अवाम मोर्चाने(धर्मनिरपेक्ष) सात जागांवर उमेदवार उभा केले होते व चार जागांवर विजय मिळवला होता. विकासशील इन्सान पार्टीने १३ जागांवर निवडणूक लढवली व चार जागांवर विजय मिळवला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT