Congress Pune infighting : पुणे काँग्रेसमधील गटबाजीने कोल्हापूरचा पैलवान चितपट? ; शहराध्यक्ष पदाची निवडही रखडली!

Internal factionalism within Pune Congress leaves Satej Patil helpless as city president election faces delay : निरीक्षक म्हणून पुण्याची जबाबदारी कोल्हापूर मधील काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
Satej Patil appears disheartened as ongoing internal groupism within Pune Congress delays the city president election process.
Satej Patil appears disheartened as ongoing internal groupism within Pune Congress delays the city president election process. sarkarnama
Published on
Updated on

Congress Leadership Crisis in Pune : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हातात घेतल्यानंतर आता राज्यभरामध्ये मोठ्याप्रमाणात संघटनात्मक उलथापालथ पाहायला मिळणार असल्याचे दिसते. काँग्रेसकडून आता संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या अहवालाच्या अनुषंगाने मुलाखती घेऊन नव्या जिल्हा, शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे.

अनेक निरीक्षकांनी आपल्याला दिलेल्या जिल्ह्याची जबाबदारी चोख बजावत अहवाल वरिष्ठांना सादर केले असले तरी पुण्याचा विषय काही वेगळाच आहे, कारण पुण्याबाबतचा अहवाल मात्र अद्याप वरिष्ठांकडे पोहचलेला नसल्याचे सांगितले जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हर्षवर्धन सपकाळ संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागले आहेत. कमी काळामध्ये काँग्रेसच्या संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नवी टीम तयार करण्याच्या कामगारीत सध्या सपकाळ असल्याचे पाहायला मिळत आहे.

Satej Patil appears disheartened as ongoing internal groupism within Pune Congress delays the city president election process.
Vijay Mallya on RCB : विजय मल्ल्याने 'RCB'बद्दल केला मोठा खुलासा; २००८ मध्ये संघ खरेदी करण्यामागचं खरं कारणही सांगितलं!

हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एका निरीक्षकाची नेमणूक केली आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते, आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेतून आलेल्या निरीक्षणाच्या आधारे या निरीक्षकांनी वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला आहे. आता या अहवालाच्या आधारेच वरिष्ठ पातळीवर नेते इच्छुक असलेल्या आणि निरीक्षकांनी शहराध्यक्ष पदासाठी सुचवलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळत आहेत.

दोन दिवसांपूर्वी याबाबत वरिष्ठ पातळीवर एक बैठक झाली या बैठकीत विदर्भ, नाशिक, मराठवाडा यासह राज्याच्या विविध भागातील रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पद भरण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीनंतर अनेक ठिकाणी शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मात्र या बैठकीला पुण्यातील कोणत्याही नेत्यांना संघटनात्मक बदलाच्या बाबतच्या चर्चांना बोलवण्यात न आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Satej Patil appears disheartened as ongoing internal groupism within Pune Congress delays the city president election process.
Donald Trump decision : ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय! आता ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत 'No Entry'

निरीक्षक म्हणून पुण्याची जबाबदारी कोल्हापूर मधील काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर सतेज पाटील यांनी पुण्यात येत विविध बैठका घेत कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी चर्चा केली . बैठका दरम्यान अनेक नेत्यांनी संघटनात्मक बदल सुचवले आहेत. त्यासोबतच पुण्यातील गटबाजी देखील या बैठकीत समोर आल्याचे पाहायला मिळालं होतं.अनेक नेत्यांनी शहराध्यक्ष बदलाबाबतची मागणी सतेज पाटील यांच्याकडे केल्याचं पाहायला मिळालं. काहींनी याबाबत थेट त्यांना सांगितलं तर काहींनी याबाबत पत्र देखील दिली.

पहिल्याच बैठकीनेमध्ये झालेल्या गटबाजीमुळे सतेज पाटील देखील गोंधळले होते असं बोललं जातं. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये सतेज पाटील दुसरी बैठक घेऊन अंतिम अहवाल वरिष्ठांना सादर करणार होते. मात्र त्यानंतर सतेज पाटील हे पुन्हा पुण्यामध्ये बैठक घेण्यासाठी फिरकलेच नाहीत.

Satej Patil appears disheartened as ongoing internal groupism within Pune Congress delays the city president election process.
Eshaan Tharoor : अमेरिकेत शशी थरूर यांना 'पहलगाम'वरून प्रश्न विचारून चर्चेत आलेले ईशान आहेत तरी कोण?

सतेज पाटील हे अंतिम बैठक घेऊन त्या आधारावर शहराध्यक्ष बदल आणि इतर संघटनात्मक बदलाबाबतचे निष्कर्ष वरिष्ठांपुढे मांडणार होते. मात्र बैठकच न झाल्याने याबाबतचा अहवाल त्यांनी वरिष्ठांकडे सादर देखील केला नसल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळेच नुकत्यात झालेल्या मुंबई येथील बैठकीमध्ये पुणे काँग्रेस मधील संघटनात्मक बदलाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या बैठकीमध्ये झालेल्या गटबाजी नंतर पैलवान म्हणून ओळख असलेले सतेज उर्फ बंटी पाटील चितपट झाले का? अशा चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com