Assembly Election update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यापाठोपाठ विद्यार्थ्यांसाठी म्हणजे लाडक्या भावांसाठी इंटर्नशिप योजना आणली. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांसाठी शिंदे सरकारने थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या अशा विविध योजना जाहीर केला होत्या. त्याचा फायदाही निवडणुकीत झाल्याचे शिंदेंनी अनेकदा मान्य केले आहे.
महाराष्ट्रातील शिंदे सरकारचा हा पॅटर्न बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राबविण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंकडून लाडका भाऊ योजना म्हणून उल्लेख केला जात असलेल्या योजनेसाठी शिक्षणानंतर नोकरीवर प्रशिक्षणासाठी (इंटर्नशिप) मानधन दिले जाते. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये, पदविकाधारकांना 8 हजार रुपये, तर पदवीधारकांना 10 हजार रुपये मानधन जाहीर करण्यात आले होते.
नितीश कुमारांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केलेल्या योजनेला मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना असे नाव दिले आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी तीन महिने ते एक वर्ष कालावधीत दरमहा मानधन दिले जाईल. बारावीनंतर पाच हजार रुपये आणि पदवीनंतर 6 हजार रुपये मिळतील. एखादा तरूण जिल्हा किंवा राज्याबाहेर इंटर्नशिप करत असेल तर त्याचा राहण्या-खाण्याचा खर्चही सरकारकडून दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील इंटर्नशिप योजनेचा फायदा किमान दहा लाख विद्यार्थ्यांना होईल, असा दावा करण्यात आला होता. तर बिहारमध्ये या योजनेमुळे सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना मानधन मिळू शकतो. चालू आर्थिक वर्षामध्ये 5 हजार लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षांत एक लाख विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे नियोजन आहे. योजनेसाठी 18 ते 28 वर्षे हा वयोगट निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान, बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी नितीश कुमार सरकारकडून विविध घटकांतील मतदारांना आकर्षिक कऱण्यासाठी योजना आणल्या जात आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकीआधी अशाच अनेक योजनांची घोषणा करण्यात आली होती. त्याचा मोठा फायदा महायुतीला झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.