Sheikh Hasina : शेख हसीना यांना पहिला मोठा झटका; कोर्टाने ठोठावली तुरुंगवासाची शिक्षा

Contempt Verdict by International Crimes Tribunal : बांग्लादेशातील न्यायाधिकरणाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

Bangladesh Politicsबांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा झटका बसला असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोर्टाच्या अवमानना प्रकरणात त्यांना दोषी धरण्यात आले असून सहा महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आल आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बुधवारी ही शिक्षा सुनावली आहे.

बांग्लादेशातील न्यायाधिकरणाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ढाका ट्रीब्यूनने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यायाधीश मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांनी शेख हसीना यांना शिक्षा सुनावली. मागील वर्षी हसीना यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये त्या माझ्याविरोधात 227 गुन्हे दाखल झाल आहेत, त्यामुळे मला त्या लोकांना मारण्याचा परवाना मिळाला आहे, असे बोलल्या होत्या.

गोबिदगंज उपजिल्हा अध्यक्ष शकील बुलबुल याच्यासोबत त्या बोलत होत्या. कोर्टाच्या अवमान प्रकरणात बुलबुल यांना यापूर्वीच दोन महिन्यांच्या शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुलबुल हे अवामी लिगची विद्यार्थी शाखा असलेल्या बांग्लादेश छात्र लीगशी संबंधित आहेत. ढाक्यामध्ये त्यांचा अनेक भागांत दबदबा आहे.

Sheikh Hasina
GST Reform : मोदी सरकारचा बंपर धमाका; सर्वसामान्यांना GST तून मिळणार मोठा दिलासा, काय-काय स्वस्त होणार?

दरम्यान, शेख हसीना यांच्या विरोधात मागील वर्षी बांग्लादेशात मोठे विद्यार्थी आंदोलन पेटले होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाही झाली. त्यानंतर हसीना या देश सोडून भारतात पळून आल्या. हे आंदोलन सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यांवर झाले होते. त्यामध्ये जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत सुमारे 1400 जणांचा मृत्यू झाला होता.

Sheikh Hasina
India Vs Pakistan : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद; जुना डाव टाकत भारताला खिंडीत गाठणार?

शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आधीच त्या मोठ्या संकटात सापडल्या आहेत. बांग्लादेशातील अंतरिम सरकारकडून त्यांना मायदेशी आणण्यासाठी सातत्याने भारताकडे विनंती केली जात आहे. हसीना भारतात आल्यानंतर काही दिवसांतच मोहम्मत यूनुस यांच्यावर अंतरिम सरकारची जबाबदारी आली. पण अजूनही तेथील स्थिती फारशी सुधारलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com