Congress Sarkarnama
देश

Bihar Political News : बिहारमध्ये पुन्हा उलथापालथ; काँग्रेसनं एक वगळून सर्व आमदारांना हलवलं राज्याबाहेर

Rajanand More

New Delhi : झारखंडमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना बिहारमध्ये पुन्हा उलथापालथ सुरू झाली आहे. बिहारमध्ये नितीशकुमार सरकारची बहुमत चाचणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसला फुटीची भीती सतावू लागली आहे. या काळात घोडेबाजार होण्याच्या शक्यतेने पक्षाने सर्व आमदारांना राज्याबाहेर हलवण्याच्या निर्णय घेतला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) आमदारांना हैद्राबादला हलवले होते. उद्या या राज्यात चंपई सोरेन (Champai Soren) सरकारला बहुमत चाचणी सामोरे जावे लागणार आहे. त्याआधी सर्व आमदार राज्यात परतणार आहे. झारखंडमध्येही जेएमएम आणि काँग्रेसचे (Congress) आघाडी आहे. आता बिहारमध्येही नितीशकुमार (Nitish Kumar) सरकारची 12 तारखेला परीक्षा आहे. नितीशकुमारांनी राजदसोबतची आघाडी तोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे.

बिहारमध्ये (Bihar) काँग्रेसचे एकूण 19 आमदार आहेत. त्यापैकी 18 आमदारांना आज हैद्राबादला पाठवले जात आहे. हे सर्व आमदार 10 किंवा 11 तारखेला बिहारमध्ये परतणार असल्याचे सांगितले जात आहे. एक आमदार वैयक्तिक कारणांमुळे जाणार नसल्याची माहिती आहे. काँग्रेसचे काही आमदार नितीशकुमार यांच्यासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात होती. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व आमदारांना राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीशकुमार यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळापेक्षा अधिक आमदार आहे. त्यामुळे त्यांचे सरकार सहजपणे बहुमत चाचणीत उत्तीर्ण होऊ शकते. मात्र, या काळात विरोधकांना आपला आकडा कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. बहुमत चाचणीवेळी पक्षात फूट पडू नये, यासाठी राजद, काँग्रेस हे पक्ष प्रयत्न करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT