Telangana : तेलंगणची सत्ता गेल्यानंतर भारत राष्ट्र समिती आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. चार टर्म आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केसीआर यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. केसीआरच्या यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री होते. (K. Chandrashekar Rao News)
माजी आमदार राजैह थाटीकोंडा (Rajaiah Thatikonda) यांनी पक्षप्रमुखांना पत्र पाठवून राजीनामा दिला आहे. पक्षात काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. थाटीकोंडा यांना मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. ते स्टेशन घाणपूर मतदारसंघाचे आमदार होते. तिकीट नाकारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गुडघे टेकवून रडतानाचा त्यांचा व्हिडिओ त्यावेळी व्हायरल झाला होता.
निवडणुकीनंतर केसीआर सत्तेबाहेर गेले आणि त्यांच्या पक्षालाही आता घरघर लागल्याचे दिसत आहे. तिकीट नाकारल्यापासून थाटीकोंडा हे नाराज होते. आता लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावरच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
थाटीकोंडा हे 2009 ते 2023 या कालावधीत चार टर्म आमदार होते. 2011 पर्यंत ते काँग्रेसमध्ये (Congress) होते. पण त्यानंतर त्यांनी केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केला. स्वतंत्र तेलंगणच्या चळवळीला पाठिंबा म्हणून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. २०१४ च्या निवडणुकीत केसीआर यांची सत्ता आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि आरोग्यमंत्रिपद देण्यात आले होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत केसीआर यांच्यासमोर काँग्रेसच्या आव्हान असणार आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने विधानसभा निवडणुकीप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला पारड्यात अधिक जागा पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.