पाटना : बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे (Nitish Kumar) सरकार कोसळले आहे. आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेत नितीशकुमार यांनी भाजपपासून फारकत घेत राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. आता ते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
मागील काही जेडीयू-भाजपची दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आज नितीश कुमार यांनीच युती तोडल्याची घोषणा केली. त्यापुर्वी त्यांनी आज आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे मुख्यंंमंत्री पदाचा राजीनामा दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जनता दल (संयुक्त) मध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्यातच भाजपने आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. असा आरोप नितीश कुमार यांनी केला होता. या आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान, नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या नीति आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार गेले नव्हते.
गेल्या एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद ताणला गेला. या घटनांनतर कोणत्याही क्षणी बिहारमधील भाजप –जेडीयूमधील युती तुटू शकते, असे तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्याची घोषणा केली आणि या चर्चांना पूर्णविराम दिला.
तर दुसरीकडे, विरोधी पक्षाचे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलानेही आपल्या आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यास राष्ट्रीय जनता दल त्यांच्याशी आघाडी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही दिवसांत बिहारमध्ये नवी सत्ता समीकरणे जुळून येऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.