Satara : शंभूराज देसाईंच्या आई म्हणाल्या, त्याला मी Collector करणार होते, पण....

आम्हाला खूपच आनंद झाला आहे. तीन पिढ्यानंतर Three generations later आमच्या देसाई घराण्याला Desai Family हे पद मिळाले आहे. मुळात शंभूच्या Shambhuraj Desai जीवनात खूपच संघर्ष आहे.
Shambhuraj Desai, Vijayadevi Desai
Shambhuraj Desai, Vijayadevi Desaisarkarnama
Published on
Updated on

सातारा : शंभूराज कॅबिनेट मंत्री झाल्याचा आम्हाला खूपच आनंद झाला असून तीन पिढ्यानंतर आमच्या घरात हे पद मिळालेले आहे. मुळात शंभूच्या जीवनात खूप संघर्ष आहे. त्याला मी कलेक्टर करणार होते, पण तो दुर्दैवाने राजकारणात आला. पण, त्याने त्याचे चीज केलं, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांच्या आई विजयादेवी देसाई यांनी दिली आहे.

शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. या पार्श्वभूमीवर देसाईंची आई विजयादेवी यांच्या भावना जाणून घेतल्या. त्या म्हणाल्या, आम्हाला खूपच आनंद झाला आहे. तीन पिढ्यानंतर आमच्या देसाई घराण्याला हे पद मिळाले आहे. मुळात शंभूच्या जीवनात खूपच संघर्ष आहे.

Shambhuraj Desai, Vijayadevi Desai
कुठे निघालो होते, हे पत्नीलाही सांगितले नव्हत... : शंभूराज देसाई

त्याला मी कलेक्टर करणार होते. पण, दुर्देवाने तो इकडं राजकारणात आला. पण, त्याचे त्याने चीज केलं आहे. दोघा भावांचे राजकारणात व्यवस्थित चांगले चालले आहे. इतक्या संघर्षातून त्याला हे मंत्रिपद मिळाले आहे. ही मोठी उडी होती. आम्हाला घरात भिती वाटत होती, पण इश्वर कृपेने चांगले झालं आहे. काळजीचा प्रश्न होता. इतकं मोठ पद मिळणार का, कसे होणार असे वाटत होते. पण चांगले झालं.

Shambhuraj Desai, Vijayadevi Desai
Satara : अजित पवारच सरकार चालवत होते...शंभूराज देसाईंचा आरोप

देसाईंचे बंधू रविराज देसाई म्हणाले, आम्हाला काळजी वाटत होती, महिनाभर अनिश्चिततेचे वातावरण होते, नक्की यातून चांगले होईल का. सन्मानाची जागा साहेबांना मिळेल असे वाटत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर आमच्या घराला दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. लोकनेत्यांच्या नावाला साजेसे काम त्यांच्या हातून होईल. साहेबांना खाते ही चांगले मिळेल. जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब व्हावेत, अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com