Bjp News : आगामी काळात बिहारमध्ये स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षाकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. बिहारमध्ये भाजपने मित्रपक्षाना सोबत घेत महायुती केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल दिसत नाही. भाजपसाठी संकटमोचक म्हणून काम करणाऱ्या लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनीच मोठा धक्का दिला आहे. भागलपूरमधील भाजपच्या एका बडा नेत्याने त्यांच्या समर्थकांसह पक्षाला रामराम ठोकत लोक जनशक्ती पार्टीत प्रवेश केला आहे.
बिहारमधील भाजपचे (BJP) भागलपूर जिल्हा खजिनदार, महानगरपालिका नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य राहिलेले अश्विनी जोशी 'माँटी' यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी भाजपमधून बाहेर पडल्यानंतर पाटणा येथे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही या पक्षात सहभागी झाले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र विवेक यांनी त्यांना अधिकृतपणे पक्षात प्रवेश दिला.
पाटण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये लोक जनशक्ती पक्ष (LJP) खगरियाचे खासदार राजेश वर्मा, बिहार सरकारचे मंत्री संजय सिंग, मंत्री संजय पासवान, आमदार बाबूलाल शौर्य आणि एलजेपी (रामविलास) च्या राष्ट्रीय प्रवक्त्या यामिनी मिश्रा यांच्या उपस्थित त्यांनी पक्षप्रवेश केला.
अश्विनी जोशी 'माँटी' यांना सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची संघटनात्मक कौशल्ये, कार्यक्षमता आणि जनतेशी जोडले जाण्याची क्षमता ही पक्षासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, या प्रवेश सोहळ्यावेळी बोलताना खगरियाचे खासदार राजेश वर्मा म्हणाले की, माँटी गेल्या सुमारे 20 वर्षांपासून अधिककाळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे आणि समर्पित भावनेने काम करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.