Nitish Kumar
Nitish Kumar sarkarnama
देश

Bihar Politics: 'मरण आले तरी चालेल पण, मी भाजपमध्ये..'; नितीश कुमार यांचे मोठं विधान

सरकारनामा ब्युरो

Nitish Kumar News : सत्ताधारी जनता दल युनाटेडमध्ये राजकीय खळबळ उडाली असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नितीश कुमार हे माध्यमांशी बोलत होते.

नितीश कुमार म्हणाले, 'आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व मानणारे होते. त्यानंतरही मी भाजपला रामराम ठोकला होता. भाजपने मला बळजबरीने पुन्हा भाजपमध्ये येण्यास भाग पाडले. २०२० मध्ये मी मुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हतो, पण भाजपने जे काही केले ते सर्वांनी पाहिले. त्यानंतरही आम्ही त्यांना सन्मान दिला,"

"आता मला मरण आले तरी चालेल, पण मी भाजपसोबत जाणार नाही," अशी घोषणा त्यांनी केली. "आगामी निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील, हे समजेलच," असा इशारा नितीश कुमार यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना दिला आहे.

उपेंद्र कुशवाहा यांच्या टीकेनंतर नितीश कुमार यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. उपेंद्र कुशवाहा म्हणाले, "जदयूचा बडा नेता भाजपच्या संपर्कात आहे," कुशवाहा हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा काही दिवसापूर्वी सुरु होत्या. पण त्यावर त्यांनी स्पष्टीकरण करीत जदयू सोडणार नसल्याचे सांगितले होते.

यापूर्वीही बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी सांगितले होते की भाजप कुठल्याही परिस्थितीत नीतिश कुमार यांच्याशी युती करणार नाही. सुशील कुमार मोदी म्हणाले, "बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे की नितीश कुमार यांची मतदाराना आकर्षित करण्याचा क्षमता संपली आहे. २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये प्रचार केला नसता तर, जेडीयूला १५ जागाही जिंकता आल्या नसत्या. नितीश कुमार यांच्या जाण्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT