Congress Political News : Sarkarnama
देश

Bihar Politics : बिहारमधील काँग्रेसचे काही आमदार 'नॉट रिचेबल'; राजकीय भूकंप होणार?

Chetan Zadpe

Bihar News : बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान काँग्रेसचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राजकीय उलथापालथ होण्याच्या पार्श्वभूमीवर आता बिहारमधील काँग्रेसच्या काही आमदार 'नॉट रिचेबल' झाले आहेत. काही आमदारांचे फोन सतत बंद येत आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, काँग्रेसचे हे आमदार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश करण्याची शक्यता बोलवून दाखवली जात आहे. (Latest Marathi News)

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (युनायटेड) अध्यक्ष नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत जाण्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. नितीश कुमार कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात आणि भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन करु शकतात. बिहारमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात नितीश कुमार सहभागी झाले होते. त्यामुळे बिहारमधील राजकीय भूकंपाबाबत सुरू शक्यतांना जोर आले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्यासह इतर पाहुण्यांना शुभेच्छा देताना दिसले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे किती आमदार ?

बिहारमध्ये मागील 2020 च्या विधानसभा निवडणुकीत 243 जागांच्या विधानभेत काँग्रेसचे एकूण 19 आमदार निवडून आले होते. यापैकी आता काही आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणात ते कुठे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT