Ashwini Kumar Choubey, Nitish Kumar Sarkarnama
देश

Bihar Politics : ‘एनडीए’मध्ये घमासान; भाजपच्या बड्या नेत्याचं नितीश कुमारांसह थेट प्रदेशाध्यक्षांना आव्हान

BJP in Bihar Ashwini Kumar Choubey Samrat Chaudhary : अश्विनी कुमार चौबे यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदात थेट प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्यावर टीका केली आहे.

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या सरकारमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर भाजपच्याच बड्या नेत्यानं निशाणा साधला आहे. त्यांनी बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा आग्रह धरल्याने एनडीएमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.

बिहार भाजपमध्ये बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाही आयात माल म्हणत हिणवलं आहे. चौबे यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी आता उघडपणे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

चौबे म्हणाले, ‘दुसऱ्या ठिकाणाहून आयात करण्यात आलेला माल नको. प्रदेशाध्यक्ष पक्षाचे मुळ सदस्यांना बनवायला हवे.‘ चौबे यांच्या या विधानामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चौबे यांनी नितीश कुमारांनाही लक्ष्य केले आहे.

बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बनायला हवे, असे म्हणत चौबेंनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. त्यावरून एनडीएमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही नितीश कुमारांना सोबत घेऊन जात होतो आणि जात आहोत. त्यांना घेऊन पुढेही जाऊ. पण मुख्यमंत्री कोण असेल, हे निवडणुकीनंतर पक्ष आणि केंद्रीय नेतृत्व निश्चित करेल. पण बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढायला हवी, असे स्पष्ट मत चौबे यांनी व्यक्त केले आहे.

चौबे यांनी सम्राट चौधरी यांचे नाव न घेता टीका केली आहे. सम्राट चौधरी हे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या राबडी देवी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. 2005 मध्ये सत्ता गेल्यानंतर ते अनेक वर्षे पक्षासोबत काम करत होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT