Video Om Birla : ओम बिर्ला यांच्याकडून राष्ट्रगीताचा अवमान? लोकसभेतील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल...

Parliament Session Live Lok Sabha Speaker Om Birla Anthem : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Parliament Session Om Birla
Parliament Session Om BirlaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राष्ट्रगीताचा आदर आणि सन्मान करणे, हे प्रत्येक भारतीयाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यावरून अनेकदा वादही निर्माण होतात. असाच वाद आता थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविषयी सुरू झाला आहे. लोकसभेमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना बिर्ला यांनी त्याचा मान राखला नाही, असा दावा करत अनेक नेटकऱ्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांचे संसदेत अभिभाषण झाले. त्याआधी संसदेत दाखल झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले. पण त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आपल्या जागेवर पोहचले नव्हते. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर ते आपल्या जागेवर जाण्यासाठी चालतच राहिले. हे दृश्य संसद टीव्हीच्या कॅमेरात कैद झाले आहे.

संसद टीव्हीवरील बिर्ला यांची राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतरही चालत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. प्रामुख्याने काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘एक्स’वर ही क्लिप पोस्ट करून बिर्ला यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचे म्हटले आहे.

Parliament Session Om Birla
Parliament Session Update : मला पाहा, फुले वाहा! संसद टीव्हीचा कॅमेरा 73 वेळा मोदींवर तर राहुल गांधींवर फक्त…

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही बिर्ला यांची ही क्लिप एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रगीत सुरू आहे, पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला बागेत फिरत आहेत. ओम बिर्ला यांच्यामुळे कोणत्याही गोदीभक्तांच्या भावना दुखावणार नाहीत, असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

Parliament Session Om Birla
Parliament Session Live : देश संविधान से चलेगा या राजा के डंडे से! नव्या वादाला फोडणी...नेमकं काय घडलं?

लोंढे यांच्यासह काँग्रेसच्या सोशल मीडियातील टीममधील अनेकांनी बिर्ला यांचा हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे राष्ट्रीय समन्वयक विनय कुमार डोकानिया यांनी म्हटले आहे की, बिर्ला यांना केवळ संविधानाच नाही तर राष्ट्रगीताचीही अडचण आहे. त्यामुळे ते आज संसदेत राष्ट्रगीताचा अवमान करताना दिसले.

राष्ट्रगीत सुरू असताना आहे त्या जागी उभे राहावे, हे अध्यक्षांनी माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि आरएसएसच्या लोक राष्ट्रगीताचा अवमान करताना दिसत असतात. ही भाजपची परंपरा आहे का, असा सवालही डोकानिया यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com