Nitish Kumar, PM Narendra Modi Sarkarnama
देश

JDU-BJP Government News : नितीश कुमारांची पुन्हा पलटी! भाजपसोबत शपथविधीचा मुहूर्त ठरला?

Nitish Kumar News : नितीश कुमारच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

Rajanand More

Bihar News : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. संयुक्त जनता दल आणि भाजपच्या सरकारचा शपथविधी 28 जानेवारीला होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमारच या सरकारमध्येही मुख्यमंत्री असतील, तर सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असेही सांगितले जात आहे. (JDU-BJP Government News) 

भाजपसोबत (BJP) काडीमोड घेत नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) जाणे पसंत केले होते. पण आता दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे. नितीश कुमारांनी घराणेशाहीवर केलेली टीका लालूप्रसाद यादव यांना उद्देशून असल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजपनेही बंद दारे आता उघडली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे नितीश कुमार आता पुन्हा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयू आणि भाजप सरकारचा 28 जानेवारीला शपथविधी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून तर सुशील मोदी हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सुशील मोदी यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना म्हटले होते की, बंद असलेली दारे उघडली जाऊ शकतात. राजकारण हे शक्यतांचा खेळ असल्याचेही ते म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेगात सुरू झाल्या. भाजपने नितीश कुमारांची कोंडी करण्यासाठी ठाकूरांना भारतरत्न जाहीर केल्याची चर्चा आहे. त्याचा परिणामही दिसू लागले असून नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत जाण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

आरजेडीचीही तयारी जोरात

एकीकडे नितीश कुमार भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू असताना लालूंनीही संख्याबळ जमवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. बिहारमध्ये (Bihar) सत्तास्थापनेसाठी 122 हा जादूई आकडा आहे. नितीशकुमारांनी (Nitish Kumar) साथ सोडल्यास लालूंना (LaluPrasad Yadav) आठ आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. बिहार विधानसभेत 243 सदस्य असून सध्या आरजेडीकडे 79 आमदार आहेत. मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे (Congress) 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या आमदारांचा एकूण आकडा 114 पर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्यांना आणखी आठ आमदार जमवावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT