Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातच माजी उपमुख्यमंत्री पडले बेशुध्द

Mahmood Ali : कार्यक्रम सुरू असताना तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री मेहमूद अली यांना चक्कर आली.
Mahmood Ali
Mahmood AliSarkarnama
Published on
Updated on

Telangana News : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वत्र उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. तेलंगणामध्ये एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री महमूद अली सहभागी झाले होते. पण कार्यक्रम सुरू असतानाच अली अचानक बेशुध्द पडले. त्यानंतर त्यांना उपस्थितांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Republic Day 2024)

तेलंगणा (Telangana) भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात सुरू असतानाच अली यांची तब्बेत बिघडली. ते बेशुध्द पडल्याने कार्यक्रमात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून कार्यक्रमातील लोक त्यांना उचलताना दिसत आहेत. काही जण अली यांच्या हाताचे तळवे चोळताना दिसत आहेत.

Mahmood Ali
Karnataka Congress : काँग्रेसला लोकसभेआधी मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्र्यानंतर माजी उपमुख्यमंत्रीही भाजपत जाणार?

अली यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्बेत आता ठीक असल्याचे समजते. दरम्यान, महमूद अली (Mahmood Ali) हे तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांनी गृह, महसूल ही महत्वाची खातीही सांभाळली आहेत. सध्या ते आमदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अली हे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. केसीआर यांनी २०१८ मध्ये मुख्यमंत्रिपदी शपथ घेताना त्यांच्यासोबत अली यांचाच शपथविधी झाला होता. त्यांना गृह खाते देण्यात आले होते.

Mahmood Ali
Karnataka Politics : ‘आमदारकी, सन्मान देऊनही माजी मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com