Prashant Kishor, Jahnavi Das Sarkarnama
देश

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्या पत्नी पहिल्यांदाच राजकीय मंचावर; अशा जुळल्या होत्या रेशीमगाठी?

Rajanand More

Patna : राजकीय रणनीतीकार म्हणून देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले प्रशांत किशोर सध्या बिहारच्या राजकारणात भूंकप घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. घरापासून अनेक दिवसांपासून दूर असलेले ‘पीके’ लोकांच्या गळ्यातील ताईत बनू पाहत आहेत. याचे श्रेय त्यांनी आपल्या डॉक्टर पत्नीला दिले आहे.

प्रशांत किशोर यांच्याकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. जनसुराज या संघटनेच्या माध्यमातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी महिला संघटन मजबूत करण्यासाठी नुकताच महिला मेळावा घेतला. त्याला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळाला. या मेळाव्यात त्यांनी पहिल्यांदाच पत्नी जान्हवी दास यांचा परिचय करून दिला.

जान्हवी या डॉक्टर असून बिहारमध्येच राहतात. यापूर्वी त्या कधीही प्रकाशझोतात आल्या नाहीत. राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांपासून त्या नेहमीच दूर राहिल्या. पूर्वी प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांसाठी काम करत होते. आता ते स्वत:च मैदानात उतरल्याने पत्नीही पुढे सरसावली आहे.

महिला मेळाव्यात बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, मी दोन वर्षांपासून कुटुंपासून दूर आहे. तुमच्यासारखी महिलाच माझी पत्नी असल्याने हे शक्य होत आहे. ती डॉक्टर आहे. पण डॉक्टरकी सोडून कुटुंब सांभाळत आहे. बिहारमध्ये जे करायचे आहे ते करा, मी घर सांभाळते, असे तिने सांगितले आहे. आज मी पत्नीची तुमच्याशी ओळख करून देण्यासाठी बोलवले आहे.

पत्नीची ओळख करून देताना प्रशांत किशोर यांनी यांच्यामुळे मी काम करू शकत असल्याचे सांगितले. कोणीतरी महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असल्याने तुमचा भाऊ काम करू शकत आहे. त्याचप्रमाणे जनसुराजमधील इतर पुरूषांनाही काम करणे शक्य होत आहे, कारण त्यांच्या मागेही महिला उभ्या आहेत, असेही ‘पीके’ म्हणाले.  

कोण आहेत जान्हवी दास?

जान्हवी दास या मुळच्या आसाम राज्यातील आहेत. ते पेशाने डॉक्टर असल्या तरी सध्या या सेवेत कार्यरत नाहीत. प्रशांत किशोर आणि जान्हवी यांची पहिली ओळख यूएनमधील एका आरोग्यविषयक कार्यक्रमात झाली होती. या भेटीचे रुपांतर नंतर मैत्रीमध्ये आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी विवाह केला. त्यांना एक मुलगा असून तिघेही बिहारमध्येच राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT