Assembly Election 2024 : भाजपवर नामुष्की; नेत्यांच्या नाराजीमुळे उमेदवारी यादी मागे, 15 जणांची नवी लिस्ट

BJP Jammu And Kashmir Election Candidates List : भाजपने सोमवारी सकाळी तिन्ही टप्प्यांतील 44 जणांची उमेदवारी यादी जाहीर केली होती.  
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी सकाळी 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पण काही वेळातच ही यादी मागे घेण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. त्यानंतर आता भाजपने केवळ 15 उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे.

भाजपने सकाळी तिन्ही टप्प्यांतील उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, सुधारित यादीमध्ये केवळ पहिल्या टप्प्यांतील 15 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. इतर दोन्ही टप्प्यांतील उमेदवारांची नावे रद्द समजण्यात यावीत, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यांतील मतदारसंघातील उमेदवारांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत.

BJP
Ladakh Politics : काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागताच लडाखसाठी मोठा निर्णय; अमित शाहांकडून घोषणा

सुरूवातीला जाहीर कऱण्यात आलेल्या यादीमध्ये अनेक मातब्बर नेत्यांच्या नावांचा समावेश नव्हता. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष निर्मल सिंह यांना तिकीट नाकारण्यात आले होते. 2014 मध्ये त्यांनी बिलावर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांचेही पहिल्या यादीत नाव नव्हते.

यादी जाहीर होताच अनेक नेत्यांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बंड टाळण्यासाठी पक्षाने जाहीर केलेली यादी मागे घेतल्याची चर्चा आहे. आता केवळ पहिल्या टप्प्यांतील उमेदवारच जाहीर करण्यात आले आहेत.

BJP
Jammu and Kashmir Election : भाजपची 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दोन काश्मिरी पंडितांना तिकीट

दरम्यान, राज्यात तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे 24, 26 आणि 40 जागांवर मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखा 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा असून 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.   

राज्यात भाजपने कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी झाली आहे. आज जागावाटपावर अंतिम बोलणी सुरू आहेत. त्यानंतर पुढील एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.



Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com