Prashant Kishor Sarkarnama
देश

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात शाहरुख, अभिषेक बच्चनची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची गुगली...

Prashant Kishor Shahrukh Khan Abhishek Bachchan : प्रशांत किशोर यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे.

Rajanand More

Patna : बिहारमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाविरोधात उतरले आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांवर ते सातत्याने टीका करत असतात. अशातच त्यांनी बॉलीवूड किंग शाहरुख आणि आणि अभिनेते अभिषेक बच्चन यांनाही राजकारणात आणले आहे.

प्रशांत किशोर यांनी स्वत:ची तुलना शाहरुखशी तर तेजस्वी यादव यांना अभिषेक बच्चन म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले, शाहरुख खान यांनी सुरूवातीला टीव्हीवर फौजी आणि सर्कस या मालिकांमध्ये काम करत करिअरला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी मेहनतीने स्वत:ला सिध्द केले. कष्टाच्या जोरावर त्यांनी बॉलीवूडमध्ये किंग खान अशी ओळख निर्माण केली.

शाहरुख यांनी करिअरच्या सुरूवात केली तेव्हा त्यांच्या जवळ अभिषेक बच्चनप्रमाणे कोणताही पर्याय नव्हता. सुरूवातीला जे काम मिळेल, ते त्यांनी केले आणि आपली वेगळी ओळख बनवली. बॉलीवूडमध्ये अनेक वर्षांनंतर, अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर पसंतीचे दिग्दर्शक, प्रोडक्शन हाऊस स्क्रिप्ट निवडणे सुरू केल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

दुसरीकडे अभिषेक बच्चन यांची ओळख ते अमिताभ बच्चन यांचे पुत्र अशी आहे. त्यामुळे त्यांना नेहमी आपल्या पसंतीचे काम निवडण्याची संधी मिळाली. अभिषेकप्रमाणेच तेजस्वी यादव यांचीही ओळख ते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र अशी आहे. आपल्या वडिलांमुळे त्यांना राजकारणात सर्वकाही मिळाले. तेजस्वी यांना तर जीडीपी आणि जीडीपी विकास दर यातील फरकही माहिती नाही, असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला आहे.

बिहारचे हे दुर्दैव असल्याचे सांगताना प्रशांत किशोर म्हणाले, ज्ञान आणि बुध्दीच्या मातीमध्ये बदमाश, अशिक्षित लोकांना आपण आपले नेते बनवले आहे. पण ज्याप्रमाणे शाहरुख खानने बॉलीवूडमध्ये आपला मार्ग आणि आपली ओळख स्वत: निर्माण केली, त्याप्रमाणे राजकारणात मी माझी ओळख बनवली असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT