Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi : जातीवर आधारित आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? राहुल गांधींचं मोठं विधान

Caste Based Reservation Congress : राहुल गांधी सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. तसेच त्यांनी आरक्षणाची 50 टक्केंची मर्यादा वाढवण्याचीही मागणी केली आहे.
Published on

New Delhi : देशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद-प्रतिवाद सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविषयी मोठे विधान केले आहे. एकीकडे जातनिहाय जनगणनेची सातत्याने मागणी करत असताना त्यांनी जातीवर आधारित आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार, या प्रश्नावर थेट उत्तर दिले आहे.

राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना जातीवर आधारित आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, देशात निष्पक्षता असेल तेव्हाच काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्यातरी देशात अशी स्थिती नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi
Assembly Election : शिंदे, दादांचा सुपडा साफ होणार? भाजपचा अंतर्गत सर्व्हे रोहित पवारांनी फोडला...

आर्थिक स्थितीची माहिती देताना राहुल म्हणाले, तुम्ही जेव्हा आकडे पाहता त्यानुसार आदिवासींना 100 रुपयांपैकी 10 पैसे मिळतात, दलितांना पाच रुपये आणि ओबीसींना जवळपास तेवढेच पैसे मिळतात. त्यांना वास्तविकपणे भागादारी मिळत नाही. देशातील 90 टक्के लोकांना समान संधी मिळत नाही. उद्योगपतींच्या यादीत मला आदिवासी, दलित दाखवा. पहिल्या 200 मध्ये केवळ एक ओबीसी आहे. प्रत्यक्षात ओबीसींची लोकसंख्या 50 टक्के आहे.

समान नागरी संहितेवर बोलणे राहुल गांधी यांनी टाळले. या कार्यक्रमाआधी प्रवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, काही राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत कमजोर असल्याचे आरएसएसचे म्हणणे आहे. भाषा आणि धर्मांबाबतही तेच बोलतात. हीच आरएसएसची विचारधारा आहे.

Rahul Gandhi
Chirag Paswan : चिराग पासवान यांना रोखण्यासाठी भाजपचे ‘पारस’ अस्त्र? नितीश कुमारांनाही भेदणार...

खरंतर हे लोक भारताला समजू शकले नाहीत. तुम्ही पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्याचे असा, तुमचा प्रत्येका स्वतंत्र इतिहास, परंपरा आणि भाषा आहे. प्रत्येकाचे महत्व समान असल्याचे मला वाटते, असे राहुल यांनी स्पष्ट केले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com